अंभोरे । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे सालाबादप्रमाणे वर्षानुवर्ष चालत आलेली अखंड हरिनाम सप्ताहाची सातव्या दिवशी समाज प्रबोधनकार ह.भ.प.दीपक महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तनाने सांगता मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.

 

 

 

 

 

सप्ताह कार्यकाळात दररोज पहाटे काकड-आरती , गितापारायण,अखंड विणावादन,महाराष्ट्रातील नामांकीत कीर्तनकार यांची सायंकाळी 0७ ते 0९ हरीकिर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.गावचे तरुण युवक,विविध धार्मिक मंडळ,व्यापारी,शिक्षक,शेतकरी पुत्र,मित्र मंडळाचे वतीने दररोज महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

 

 

 

Oplus_131072

अंखड हरीनाम सप्ताहाची दहीहंडी ह.भ.प दिपक महाराज देशमुख व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मा.चेअरमन तथा राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिह देशमुख यांनी फोडली.

 

 

 

Oplus_131072

यावेळी ह.भ.प दिपक महाराज देशमुख यांनी अनेक दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे देत भाविकांना मंत्रमुग्ध केले,..या सप्ताह कालावधीत गावात किर्तन व प्रवचनाने वातावरण भक्तीमय झाले होते.गावातील अनेक तरुण व जेष्ठ,विविध तरुण मित्र मंडळ यांनी एकत्र येवून अन्नदान केले.अंभोरे गाव आणि पंचक्रोशितील अबाल वृध्दासह,युवक,बाल_गोपाळासह ग्रामस्थ,महिला,युवती मोठ्या संख्येने या सप्ताहाचा आनंद घेतला.

 

 

Oplus_131072

 

अंखड हरीनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी कालावधीत सप्ताह कमिटी,ग्रामपंचायतीचे सरपंच-उपसरपंच सर्व सदस्य,सोसायटीचे चेअरमन-व्हा चेअरमन सर्व संचालक,दुध संस्थेचे चेअरमन-व्हा चेअरमन सर्व संचालक,आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले…

 

 

 

Oplus_131072

अंखड हरीनाम सप्ताहाची उत्सहाची सागंताप्रसंगी राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजिंतसिह देशमुख म्हणाले की,अंभोरे गावाने महाराष्ट्राला एक महान संत दिले.वैकुंठवाशी लक्ष्मण खेमनर बुवा जन्मभुमी अंभोरे कर्मभुमी इगतपुरी यांनी वारकरी संप्रदायाला उत्तुंग अशी भरारी दिली नव्हे तर हिंदू धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेउन धर्म प्रचार आणि प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पाडले त्यासाठी आपले संपुर्ण जिवन व्यथित केले.म्हणून तर आज अनेक त्यांनी चालविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेतुन कीर्तनकार तयार झाले.ही एकमेव संस्था जगाचे पाठीवर वारकरी संप्रदायाचे विद्यापीठ बनले यामागे वैकुंठवाशी थोर विभूती लक्ष्मण बुवा खेमनर महाराज होय !…यामागे लक्ष्मण बुवा यांची प्रेरणा आणि शक्ती आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची आणि महान संताची भुमी आहे.त्यातील आपल्या अंभोरे गावचे लक्ष्मण बुवा खेमनर हे एक होत.त्यामुळे आपल्या अंभोरे गावचे नाव उज्वल झाले असुन एक क्षेत्र अंभोरे म्हणून ओळख निर्माण झाली आहे.ही आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली याचा आपणा सर्वांना अभिमान आहे.एक सप्ताहाची हि पंरपंरा आणि त्याची महंती आणि व्याप्ती वाढेल यासाठी प्रयत्न करु व आपण सर्वांनी एकत्र येवून जो सप्ताह यशस्वी केला याबद्दल विविध महंत महाराज मंडळी,भजनी मंडळ , दररोजचे अन्नदाते,विनावादन पहारेवाले,अखंड हरीनाम सप्ताह कमिटी,गावातील सर्व तरुण मित्र व ग्रामस्थाचे आभार मानले…..

 

 

 

Oplus_131072

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *