सरपंच सौ संगीता गीते यांची मागणी
आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील पिंपरी लौकी अजमपुर हे सहा ते सात हजार लोक वस्तीचे गाव संगमनेर पासून 25 किलोमीटर व श्रीरामपूर पासून लोणी मार्गे 40 किलोमीटर असे अंतर असून या गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी वृद्ध महिला रुग्ण यांचा रोजचा संगमनेर लोणी श्रीरामपूर या तालुक्यांशी संबंध येतो मात्र कोरोना काळात सुरू असलेली मुक्कामी बस कोणतीही पूर्व सूचना न देता बंद केल्यामुळे प्रवाशांची विद्यार्थ्यांची अतोनात हाल होत आहे तरी संबंधितांनी या गावासाठी बस सुरू करावी अशी मागणी सरपंच सौ संगीता भारतराव गिते यांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका पत्रकान्वये केली आहे

त्यांनी ना विखे पाटील यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की पिंपरी हे गाव एसटी सुविधेपासून वंचित आहे येथील विद्यार्थी विद्यार्थिनी वृद्ध महिला रुग्ण हे संगमनेर व लोणी या ठिकाणी शासकीय शैक्षणिक आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ये जा करत आहे मात्र या गावापासून शिबलापुर ५ पाच किलोमीटर व आश्वी सहा किलोमीटर प्रवाशांना एसटी बससाठी पायी जावे लागते तसेच वृद्ध महिला व विद्यार्थ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागतो या गावालगत खळी कांगणवाडी चौधरवाडी खरशिंदे व वरशिंदे येथील ग्रामस्थांचंही रोजचा संबंध या गावातून येतो येथील अनेक ग्रामस्थ या मार्गेच संगमनेर लोणी श्रीरामपूर कडे जातात एसटी बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थी विद्यार्थिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे .तरी प्रवाशांची गैर सोय टाळण्यासाठी व विद्यार्थी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फायदेशीर ठरणारी पिंपरी लोकी गावासाठी संबंधितांनी तातडीने एसटी बस सुरू करावी अशी मागणी प्रवासी वर्गा सह उपसरपंच बाजीराव गिते ग्रामसदस्यांनी केली आहे .

