संगमनेर । झुंजार न्यूज
माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या अमृतवाहिनी आयटीआय मध्ये गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी टाटा मोटर्स पुणे या नामांकित कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य विलास भाटे यांनी दिली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय मध्ये सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. विद्यार्थ्यांना नोकरीची थेट संधी मिळावी याकरता अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर ट्रेनिंग प्लेसमेंट शिक्षण विभागाच्या वतीने समन्वय केला जात असतो. येत्या आठवड्यातच अमृतवाहिनी आयटीआयच्या 92 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मधून थेट निवड झाली आहे.

तरी दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी अमृतवाहिनी आयटीआय मध्ये टाटा मोटर्सच्या वतीने कॅम्पस इंटरव्यू आयोजित केला आहे. यासाठी मेकॅनिक मोटर, वेहिकल, मेकॅनिक डिझेल ,फिटर ,इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रे, बायोडाटा, फोटो व मार्कशीटसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कॅम्पस इंटरव्यूच्या आयोजनासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग व अमृतवाहिनी आयटीआयचा सर्व स्टाफ विशेष परिश्रम घेत आहे.
Post Views: 683
