झरेकाठी । झुंजार न्यूज

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

 

 

 

विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामस्थ व पालक शाळेच्या विकासात देत असलेल्या योगदानाबद्दल आनंद व्यक्त केला .गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

 

 

 

Oplus_131072

 

यावेळी विद्यार्थ्यांनी लावणी , प्रबोधनपर गीत , शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत , भक्तीगीत , कोळीगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाची रंगत आणि उत्कंठा वाढविणारे सूत्रसंचालन कैलास सहाणे यांनी केले .

 

 

 

Oplus_131072

कार्यक्रमासाठी उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम व मंडप व्यवस्था सुहास वाणी यांनी दिली . कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य ॲड . पोपटराव वाणी गावचे सरपंच अशोक नानासाहेब वाणी उपसरपंच सुरज म्हंकाळे सामाजिक कार्यकर्ते विलास वाणी ग्रामपंचायत सदस्य रमेश वाणी सौ सुनंदा वाणी मंगलताई वाणी नारायण तात्या व्यवहारे गावचे पोलीस पाटील सुदाम वाणी प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सांगळे सर, प्राथमिक शिक्षक बॅकेच्या संचालिका सरस्वती घुले ( सहाणे) ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी व्यवहारे उपस्थित होते .

 

 

 

Oplus_131072

 

कार्यक्रम सुरू होण्याअगोदर दानशूर पालकांनी विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजनाची व्यवस्था केली होती . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी , रेखा गोसावी , दिपाली पवार , सुनिता ओहळ व मंगल खेमनर यांनी विशेष परिश्रम घेतले .

 

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed