संगमनेर । झुंजार न्यूज

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ६१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी शैलेश हिंगे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली. दरम्यान, एकूण २१ जागांसाठी १०९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
थोरात कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाची शुक्रवारी (दि. ११) रोजी छाननी होणार होती, मात्र चार उमेदवारांच्या अर्जाविरुद्ध हरकत दाखल झाल्या. एका उमेदवाराचा निर्णय होणार होता, परंतू सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने मंगळवारी (दि. १५) रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २० उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे सांगितले. आता एकूण २१ जागांसाठी निवडणूक
Oplus_131072
२९ रोजी होणार चित्र स्पष्ट !
थोरात कारखान्याच्या निवडणुकीत २० उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर ४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. (दि. २९ एप्रिल) ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख असल्याने यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
Oplus_131072
रंगणार आहे. १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनेकांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केले. यामुळे अर्जाची संख्या अधिक दिसत असली तरी, उमेदवारांची संख्या मात्र कमी आहे.
साकुर गटात १७, तळेगाव गटात ११, धांदरफळ गटात १७, अकोले जवळे गटात २० तर उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटात एकाच उमेदवारांचे २ अर्ज दाखल झाले. यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची बिनविरोध
Oplus_131072
बिनविरोध’ साठी थोरातांच्या हालचाली !
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक उमेदवारांशी चर्चा केली आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Oplus_131072
थोरातांकडून दोन अर्ज दाखल
थोरात साखर कारखाना निवडणुकीत उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकट्याचे दोन अर्ज दाखल झाल्याने या गटात त्यांची बिनविरोध निवड झाली, मात्र यावर घोषणा होणे बाकी आहे.
Oplus_131072
निवड झाली आहे. अनुसूचित जाती जमाती गटात ३, महिला गटात ७ अर्ज, इतर मागासवर्ग गटात ६ तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटात ९ असे एकूण १०९ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी (दि.२९) रोजी खरे चित्र स्पष्ट होणान आहे. २० उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत. मंगळवारी रोहिदास गुंजाळ, गणपत दिघे, संभाजी शिंदे दिनकर दिघे या चारजणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed