यशोधनच्या मैदानावर शिवराय ते भीमराव गीतांमधून जागर महामानवांचा
संगमनेर । झुंजार न्यूज
काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक एक मे 2025 रोजी सायंकाळी 7 वा. यशोधन कार्यालयाच्या मैदानावर संयुक्त जयंती महोत्सव सोहळा कार्यक्रमात डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार असल्याची माहिती तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. यावर्षीही या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त गुरुवार दिनांक 1 मे 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता यशोधन जवळील मैदानावर संगमनेर काँग्रेस, युवा काँग्रेस, बहुजन विचार मंच, छत्रपती प्रतिष्ठान व विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा शिवराय ते भीमराव जागर महामानवांचा हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. प्रख्यात शाहीर वामनदादा कर्डक यांच्या गीतांसह छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विविध प्रबोधन पर गीतांचा कार्यक्रम लाईव्ह कॉन्सर्ट मधून यावेळी होणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध गायकांसह 100 कलाकारांच्या संचात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य स्टेज, एलईडी ,लाईट व्यवस्था, साऊंड सिस्टिम ,सुमारे 4000 नागरिकांची बैठक व्यवस्था, महिला व पुरुष स्वतंत्र बैठक, पार्किंग व्यवस्था अशी सर्व अत्याधुनिक सुविधा करण्यात आली आहे.

यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

तरी तालुक्यातील सर्व नागरिक युवक महिला यांनी मोठ्या संख्येने या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन युवक काँग्रेस ,बहुजन विचार मंच, रिपाई, दलित पॅंथर, छत्रपती प्रतिष्ठान व पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 643
