ग्रामविकास अधिकारी ग्रा.प. सदस्य कर्मचारीही स्वच्छतेसाठी सरसावले
आश्वी । झुंजार न्यूज
कर्मचाऱ्यांना आदेश न देता स्वतः पुढे येऊन आश्वी खुर्द चे उपसरपंच बाबा भवर यांनी चक्क हातात झाडु पाण्याची नळी घेत केली स्मशानभुमीची स्वच्छता

आश्वी खुर्द गावची स्मशानभुमी हि प्रवरा नदीलगत आहे गावात सातत्याने अंत्यविधीच्या घटना घडत असतात स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता तसेच इतर मजुर हि स्वच्छता पैसे देऊन ही करत नसल्याने मोठा प्रश्न होता मात्र यावर चर्चा करण्यापेक्षा कृती महत्वाची असल्याने येथील कर्तव्यदक्ष उपसरपंच बाबा भवर यांनी स्वत: स्मशानभुमीकडे मोर्चा वळवत ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे ग्रा .प. सदस्य सोपान सोनवणे संजय भोसले सामाजिक कार्यकर्ते पुंजाआई भक्त रामा गायकवाड मनोज भंडारे क्लार्क आदिनाथ जाधव पाणी पुरवठा कर्मचारी रावसाहेब जेडगुले नंदु राखपसरे स्वच्छता कर्मचारी मनोज राखपसरे भाग्यश्री राखपसरे व इतर कर्मचारी घेत स्वच्छतेत सहभाग नोंदवत स्मशानभुमितील काटेरी झाडे झुडपे पालापाचोळा कचरा दगड माती फावडे टोकरी कुऱ्हाडी कुदळच्या साह्याने सुमारे तिन तास भर उन्हात साफ सफाई करत व त्यांनतर पुर्ण स्मशानभुमी स्वच्छ करुन त्यावर पाण्याने धुऊन घेतली हे काम करताना उपसरपंच बाबा भवर ग्रामविकस अधिकारी प्रविण इल्हे यांनी स्वतःहुन सर्वांत पुढे होऊन हे काम करत होते हे विशेष एरवी स्वच्छाता इव्हेंट असतो तेंव्हा फक्त फोटोशषन होतो मात्र आज या पदाधिकाऱ्यांनी कुणालाही याची पुर्वसुनचना किंवा मेसेज न देता थेट स्वच्छता मोहीम राबविल्याने आश्वी परिसरात हा विषय कुतुहलाचा झाला व या पदाधिकाऱ्यांचे कौतुक होत असुन उपसरपंच बाबा भवर व त्यांच्या टिमने पुर्ण स्मशानभुमीची स्वच्छता केल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहेत.

आश्वी खुर्द गावची लोकसंख्या वाढत आहे मात्र स्वच्छाता कर्मचारी संख्या अपुरी व वेळेला मिळत नाही मात्र उपसरपंच बाबा भवर ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे ग्रा.प.सदस्य व कर्मचारी यांनी पुढाकार घेत स्मशानभुमीची स्वच्छता केली याबदल त्यांचे कौतुकासपात्र असुन माझ्या संपुर्ण टीमचा मला अभिमान आहे
सौ.अलकाताई बापुसाहेब गायकवाड सरपंच ग्रा.प. आश्वी खुर्द
