पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी केला आमदार अमोल खताळ यांचा सन्मान

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

 

 

 

आज-काल वाढदिवस म्हटले की हार तुरे गुच्छ यावर विनाकारण वायफळ खर्च होत असतो. या वायफळ खर्चाला फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेयसाहित्य भेट दिले तर निश्चितच त्यांच्या शिक्षणा साठी उपयोग होईल हाउदात्त हेतू डोळ्या समोर ठेवून आमदार अमोल खताळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शालेय साहित्य आणण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आले ल्या सर्व कार्यकर्त्यांनी शालेय साहित्य भेट देत आगळावेगळा उपक्रम राबविला गेला. पारनेर तालुक्याचे आ काशिनाथ दाते यांनी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या निवास स्थानी येऊन यांचा सत्कार केला

 

 

 

Oplus_131072

 

संगमनेर तालुक्यात गेली ४० वर्षापासून एक हाती सत्ता उलथावून टाकत एका सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ हे आमदार झाल्यानंतर प्रथमच घुलेवाडी रोडवरील साईहर्ष या निवास स्थानी त्यांच्या समर्थक मित्र परिवाराने धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता फटाक्याची आतिषबाजी करत केक कापून मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी आ अमोल खताळ यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या
आ.अमोल खताळ यांच्या घुलेवाडी येथील साई हर्ष कॉलनीतील निवास स्थानी सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. हार तुरे गुच्छ न आण ण्याचे आवाहन आ खताळ यांनी केले होते .त्यानुसार वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणारा प्रत्येक कार्यकर्ता हातात वह्यांचा गठ्ठा पेन सॅक पाणी बॉटल सिस पेन्सिल खुटरबर कंपास पेटी जेवणाचा डब्बा विविध स्पर्धा परीक्षा तसेच स्वामी विवेकानंद विनायक दामोदर सावरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक थोर महात्म्यांचे पुस्तक असे शालेय साहित्य घेऊन येत होता साई हर्ष निवासस्थानाच्या समोर उभारलेल्या मंडपामध्ये स्वतः आ अमोल खताळ हे आलेल्या प्रत्येकाच्या शालेय साहित्य स्वीकारत होते या आगळ्या उपक्रमाचे तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे

 

 

Oplus_131072

 

आमदार अमोल खताळ युवामंच कडून आम्रतूला
संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले त्यात आमदार अमोल खताळ युवा मंचच्या वतीने रोहित चौधरी वरद बागुल ऋषिकेश मुळे विनायक तांबे यांच्यासह मित्रपरिवाराच्या वतीने आमदार खताळ यांच्या वजनाएवढे रत्नागिरी हापूस आंबे आणून आम्रतूला केली . आणि हे आंबे युवा मंचच्या तरुणांनी आदिवासी वस्तीगृह स्वयंप्रेरित बालक आश्रमातील मुलांना तसेच वृद्धा श्रम या ठिकाणी नेऊन देत त्यांना अंबादास खाऊ घातला

 

 

 

 

आमदार अमोल खताळ युवा मंचच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सायखिंडी येथील गोशाळेत कत्तलीतून मुक्तता करण्यात आलेल्या जनावरांना दोन ट्रेलर मका कुट्टी तसेच घास देण्यात आला या गो शाळेतील जनावरांना आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ तसेच चिरंजीव राजवर्धन खताळ यांच्या हस्ते घास मका कुट्टी चारा खाऊ घातला तसेच समनापूर गावाच्या वतीने गावात १००० झाडांचे तसेच आमदार खताळ यांच्या निवास स्थानी ५००झाडांचे वाटप करत वतीने एक सामाजिक उपक्रम राबविला गेला.

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी राहुल सोमवंशी यांच्यावतीने आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सिंहासना धीश छत्रपती शिवाजी महाराजांची काळ्या पाषाणातील मूर्ती भेट देण्यात आल्या त्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

 

 

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील संतोष मनोहर बालोडे अमोल भानूदास गुंजाळ राहुल बालोडे माधव शिंदे या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचा भगवा हातात घेत त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली आहे

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *