आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील असणाऱ्या आश्वी व परीसरामधील अवैधरित्या धंदे राजरोजपणे सुरू असताना ओझर खुर्द येथील ओम चैतन्य गगनगिरी किराणा स्टोअर्स या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत १० हजार १४० रूपयाची गुटखा व पान मसाला तसेच देशी विदेशी दारू हस्तगत केला आहे .

आश्वी व परीसरामध्ये विविध प्रकारचे अवैध्य धंदे मोठया प्रमाणात सुरु असल्याचे दिसून येत आहे . मात्र याकडे पोलिसाचा कानाडोळा असल्याची चर्चा आहे .

ओझर खुर्दमधील आश्वी – जोर्वे रोड लगत असणाऱ्या संजय शेजूळ यांच्या मालकीचे असणाऱ्या ओम चैतन्य गगनगिरी किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये १ हजार ९२० रूपये किंमतीचा हिरा पानमसाला असे नाव असलेली १० पुडे प्रत्येकी किंमत १९२ रूपये, ४८० रूपये किमंतीचे रॉयल ७१७ तंबाखु असे नाव असलेले १० पुडे, प्रत्येकी किंमत ४८ रूपये, १ हजार ९८० रूपये किंमतीचा विमल पानमसाला असे नाव असलेली १० पुडे प्रत्येकी किंमत १९८ रूपये, २२० रूपये किंमतीचे १ पुडा तंबाखु पकडला.
