जनतेच्या आग्रहास्तव लोकनेते बाळासाहेब थोरात कारखान्याच्या चेअरमनपदी

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. प्रांताध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. यानंतर सभासद व जनतेच्या आग्रहास्तव कारखान्याच्या चेअरमनपदी मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची तर व्हा.चेअरमन पदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची एक मताने निवड झाली आहे.

 

 

Oplus_131072

 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड झाली. चेअरमन पदी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर घुले यांच्या नावाची सूचना विजय राहणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले. यावेळी नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, इंद्रजीत खेमनर, सतीश वर्पे, डॉ तुषार दिघे, रामनाथ कुटे ,नवनाथ आरगडे, विनोद हासे, गुलाबराव देशमुख, रामदास धुळगंड, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, अंकुश ताजणे ,सौ लताताई गायकर, सौ सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कारखाना येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी मा आमदार डॉ सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, लक्ष्मणराव कुटे ,सुधाकर जोशी ,शंकरराव पा खेमनर, संपतराव डोंगरे आर.बी राहणे, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक, आदीसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलताना माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त काटकसर पारदर्शकता या आदर्श तत्त्वावर व विचारांवर संगमनेरचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे. सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मध्ये अनेक अडचणी आहेत .खाजगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे . त्यामुळे स्पर्धा वाढली आहे.प्रत्येक सीजन हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो. कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात. यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे.

 

 

 

 

कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा आल्या पण सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने तो फुगा फुटला. संगमनेर तालुक्याने एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण केली आहे. येथे बंधू भावाचे वातावरण आहे. विरोधकांचाही कधी व्यक्तिदोष कोणी केला नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली. सहकार हा निकोप व पारदर्शक पद्धतीने चालतो आहे. राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो आहे. मात्र या चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी करावी लागणार आहे.

 

 

 

Oplus_131072

आता वातावरण बदलले आहे. तालुक्यात दहशत वाढते की काय असा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा विचार करा. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका .येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने लढा. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून असे सांगताना आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त काम करावे लागेल असेही ते म्हणाले.

 

 

Oplus_131072

 

तर डॉ तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. महाराष्ट्रातील सहकारातील नेतृत्व म्हणून राज्यातील लोक थोरात साहेब यांच्याकडे पाहत असून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

 

 

Oplus_131072

 

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद शेतकरी यांनी नवीन संचालक मंडळाला बिनविरोध निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे मागची परंपरा कायम राखत चांगले काम करू असे ते म्हणाले तर बाबा ओहोळ म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या तत्वांची आदर्श परंपरा आपण जपली असून खूप मोठी संधी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

 

 

Oplus_131072

यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सभासद व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

जनतेच्या आग्रहास्तव माजी मंत्री बाळासाहेब थोरात चेअरमन पदी

 

तालुक्यातील सर्व नागरिक सभासद युवक महिला या सर्वांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना विशेष आग्रह केल्याने मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली असून आगामी काळात सर्वांनी एकत्र येऊन तालुक्याची वैभवशाली वाटचाल जपण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. या निवडीनंतर कारखाना परिसरात व तालुक्यातील गावोगावी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

 

 

 

 

Oplus_131072

राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी- लोकनेते बाळासाहेब थोरात

 

जनतेच्या आशीर्वादाने व नेतृत्वाच्या विश्वासाने राज्यभरात महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली या पदांचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आपण केला. विधानसभेच्या निवडणुकीत अपघात झाला .परंतु यापुढे सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन काम करायचे आहे. पक्ष नेतृत्वाने कायम विश्वास टाकला असून राष्ट्रीय पातळीवरील सीडब्ल्यूसी च्या महत्त्वाच्या समितीमध्ये पहिल्या 21 जणांमध्ये आपला समावेश आहे याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील विविध जबाबदाऱ्यांसह सध्या गुजरातची जबाबदारी आहे. उद्या दिल्ली येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक असून राज्य पातळीवरही महत्त्वाच्या बैठकांसाठी सातत्याने आग्रह असतो हा सन्मान तालुक्याच्या जनतेचा असून सर्वांनी एकजुटीने काम करा असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed