आश्वी । झुंजार न्यूज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात आमच्या बालपण इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पानोडी च्या सर्व विद्यार्थ्यांनी एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उत्तुंग अशी भरारी घेतली. यावर्षी देखील शाळेने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा टिकवत शाळेचा निकाल तब्बल १००% लागला असून या नेत्रदीपक कामगिरीमुळे विद्यार्थी ,शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून आश्वी केंद्रात 94 % गुण मिळवून स्वरुप भोसले प्रथम आला .

या परीक्षेमध्ये स्वरूप गौतम भोसले – ९४% प्रथम क्रमांक , समृद्धी सोमनाथ त्रिभन- ९०.४०% द्वितीय क्रमांक , अनुप्रिता अनिल घुगे- ८९.२०% तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. तसेच १२ विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवत रेकॉर्ड ब्रेक केले. त्यामध्ये स्वरूप गौतम भोसले- ९४% , समृद्धी सोमनाथ त्रिभन- ९०.४०%, अनुप्रिता अनिल घुगे- ८९.२०%, मृण्मयी संदीप गाडेकर- ८८.६०%, श्रद्धा दीपक म्हसे – ८७.४०%, कल्याणी वसंत गाडेकर- ८७.००%, समिक्षा भगवान गाडेकर- ८५.४०% , अक्षदा संपत भुसाळ- ८४.२०%, वरद शिवाजी मुंढे – ८३.४०% , प्रतिक्षा सुनिल ढमाले – ८२.२०% , आराध्य संदीप जाधव – ८२%
१२.यश गणेश डोंगरे – ८१% असे गुण प्राप्त केले.


