घुलेवाडी मधील 2 कोटींची कामे ऑक्टोबर 2024 मध्येच मंजूर
नवीन लोकप्रतिनिधींनी कोणताही निधी न आणता जुन्या निधीच्या कामांचे उद्घाटन केल्याने लोकांमध्ये नाराजी
संगमनेर । झुंजार न्यूज

घुलेवाडी गावातील विविध विकास कामांबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सिताराम राऊत यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीवरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सन 2024 25 या आर्थिक वर्षांमध्ये घुलेवाडी मधील विविध विकास कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला होता.


मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक रुपयाचा नवीन निधी न आणता जुन्याच कामांचे उद्घाटन केले आहे. खरे तर नव्याने निधी आणून विकास कामे करायला हवी आहेत. मात्र नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त काही लोकांना हाताशी धरून जाहिरात बाजी करत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे.



ग्रामपंचायत मधील विकास कामांसाठी निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून — सरपंच सौ निर्मला राऊत
घुलेवाडी गाव हे मध्यवर्ती आहे लोकसंख्या मोठी असल्याने या गावासाठी मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत .पिण्याच्या पाण्याच्या सुविधा केल्या आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे ग्रामपंचायतने दिलेल्या मागणीनुसार 1 आक्टोबर 2024 रोजी या सर्व कामांसाठी निधी मिळालेला आहे. मात्र नवीन लोकप्रतिनिधीला याबाबत काही माहिती नाही असे सांगताना निधी आणा मग उद्घाटन करा असे आव्हान लोकनियुक्त सरपंच सौ निर्मला राऊत यांनी दिले आहे.

घुलेवाडीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी , निषेध याचा एकमुखी ठराव
निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. आजही कोणती अडचण आली तरी ग्रामस्थ हे त्यांच्याकडे जात असतात. नवीन लोकप्रतिनिधी यांचा या कामांशी कोणताही संबंध नसताना विविध विकास कामांचे उद्घाटन केल्याने ग्रामस्थ व महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून युवकांनी याबाबत निषेध केला आहे. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एकमुखी निषेध व्यक्त केला आहे
