आश्वीमध्ये बंगल्यावर वीज पडली , डबल मजली बंगला असल्याने मांढरे कुटुंब बचावले तर घराची सुध्दा पडझड झाली .
आठवडा बाजार पाण्याचे थैमान !
आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी-वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, हळद, कांदा, टोमॅटो, गवार चारा यांसह आंबा, डाळिंब या फळपिकांचे नुकसान झाले . तर सोमवारी दुपारनंतर आलेल्या पावसाने मोठे थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे शेती व पिकांचे नुकसान झाले असून आश्वी खुर्द येथे तर डबल मजली असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बंगल्यावर वीज पडली डबल मजली इमारत असल्याने जीवीत हानी टळली तर सर्व इलेक्ट्रीक उपकरणे जळून खाक झाले व बंगल्याला मोठे दोन छिद्र पडले .

गेल्या चार दिवसांपासून आश्वी , पानोडी , शिबलापूर , पिंप्री लौकी अजमपूर , खळी , मालुंजे , शेडगांव , हंगेवाडी , डिग्रस , अंभोरे , कनोली मनोली , उंबरी , ओझर आदी ठिकाणी रात्र दिवस लहरी नुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसासह अनेक भागांत शेती नुकसाने झाली उभे कांदयासह गवार आदी पिके काढलेली कांदे झाली. खराब झाले .

सोमवारी दुपारनंतर सुरु झालेल्या विजच्या कडक्यासह पावसाने धुमाकुळ घातला . आश्वी बु॥ येथील आठवडे बाजारात मोठा थैमान निर्माण होवून बाजार करऱ्यांना पावसामुळे मोठे संकट उभे राहिल्याचे दिसले . आश्वी खुर्द येथील मांढरे वस्ती वरील विक्रम दिलीप मांढरे यांच्या बंगल्यावरचं वीज पडली बंगला डबल मजली असल्यामुळे मांढरे कुटुंब बालबाल बचावले तर इलेक्ट्रीक उपकरणे मात्र सर्व जळाली बंगल्याला दोन मोठे छिद्र पडले .
तर शेतकरी संपत मुरलीधर गायकवाड यांच्या रहात्या घराच्या दोन्ही बाजूच्या भिंती पडल्याने धान्यासह संसारोपयोगी साहित्य पाण्यात गेल्याने गायकवाड यांचा प्रपचं मोठया आर्थिक संकटात सापडला .

अवकाळी पावसाने शेतकऱ्यासह सर्वसामान्यांची अवकाळाचं काढल्याने मोठे नुकसाने झाले रस्त्यावर झाली पडली पिपरणे ते जाखुरी रस्त्यावरचं झाड पडल्याने प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसत आहे .
