

"ताज्या बातम्या, सतत अपडेट्स - आपलं वेबसाईट, आपलं समाचार"
संगमनेर । झुंजार न्यूज
देशाच्या सुरक्षेसाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सुपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले आहे. ते 15 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते आणि जम्मू-काश्मीरमधील तीसवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले.
