सोमवारी वादळी व वीजेच्या कडक्यासह अवकाळी पाऊसात आश्वी खुर्द मधील मांढरे यांच्या बंगल्यावर वीज पडली 

आश्वी | झुंजार न्यूज

 

 

 

सोमवारी सांयकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पावसाने रुद्र अवतार धारण केला होता वादळी वारे विजांचा कडकडाट सुरु होता माझा सर्व परिवार बंगल्याच्या हॉल मध्ये बसलेला होता त्याच वेळी एक मोठा आवाज जो स्फोटासारखा होता कडकडाट भंयकर होता क्षणात आम्ही सर्व मरणार असे वाटले मात्र आयुष्य भर परमेश्वर विठ्ठलाचे नित्यनियमाने मनोभावाने केलेले भजन पुजन आज माझ्या परिवाराच्या कामे आल्याची प्रतिक्रिया येथील विठ्ठल भक्त व त्यांच्या बंगल्यावर विज पडली व त्यातुन सुखरूप बचावलेले मांढरे कुटुंबाचे प्रमुख दिलीप मांढरे यांनी दिली

 

 

 

Oplus_131072

सोमवारी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात आश्वी खुर्द येथील विक्रम दिलीप मांढरे यांच्या घरावर वीज कोसळली सुदैवाने व ईश्वर कृपेने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र मांढरे परिवाराचे सुमारे पाच लाखाहुन अधिक नुकसान झाले आहे वादळी वारा आणि पाऊस सुरु असतानाच विजांच्या कडकडाटात मांढरे यांच्या घरावर वीज कोसळली त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र हॉल मध्ये बसले होते तर घरा जवळच मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सुमारे ३० फुट रुंद व १०० फुट लांब पत्र्याचा गोठा व त्यात २० गाई होत्या व घरावर सोलर पॅनल होते त्यावर विज पडली मोठा आवाज झाला डोळे झाकले व आत्ता आपले काही खरे नाही असे वाटले विठलाचा धावा सुरु होताच डोळे उघडले व शेजारी कुठे तरी विज पडली म्हणुन बाहेर डोकत असतानाच जिन्याने सौर पॅनलचे व घरातील विजेचे जळालेले बोर्ड थेट हॉल मध्ये जोरात येऊन पडले तेंव्हा खात्री झाली कि विज आपल्याच खरावर पडली कुटुंबातील सहा जण विस गाई फक्त पांडुरगाच्या कृपेनेच वाचल्या आणि अचानक आनंद व दुख आश्रु अनावर झाले वरच्या मजल्याच्या स्लॅबला दोन होल पडले जिन्याच्या एँगलचे पाणी झाले संपूर्ण विदयुत यंत्रणा वायर बोर्ड ट्युब फॅन इन्वर्टर सर्व यंत्रणा जळुन गेली रात्री जसजशी बातमी गावात पसरली मोठ्या प्रमाणात मित्र नातलग घटनस्थळी आले आम्हाला धीर दिला सकाळी महसुल पथकांने पंचना केला मात्र या कुंटुबाला अजुनही आपण सुरक्षित आहे याचा विश्वास बसत नाही व्यवसायाने शेतकरी असलेले हे कुटुंब दुध व्यवसायावर अवलंबून आहे तर दिलीप मांढरे हे स्वत माळकरी आहे गावातील काकडा हरिपाठ भजन किर्तन प्रवचन बारशे अंत्यविधी सर्व ठिकाणी सात त्याने भजनाला हजरी लावतात व आज त्यांच्या विठठल भक्तीने त्यांचा परिवार सुखरुप आहे अशी प्रतिक्रिया संपूर्ण मांढरे कुटुंबाने दिली

 

 

 

 

सोमवारी सांयकाळी झालेल्या या पावसाने शेतकरी संपत मुरलीधर गायकवाड यांच्या रहात्या घराची भिंत पडली तसेच भवर वस्तीवर दत्त मंदिराजवळ निलेश बाळासाहेब भवर यांच्या नारळाच्या झाडावर विज पडली मात्र येथे कोणतीही जिवित अथवा वित्त हानी झाली नाही

 

 

 

या घरातील सर्व व्यक्ती परमार्थीक विठठल भक्त आहे घरातील इतर सर्व भागात प्रंचड नुकसान झाले मात्र ज्या हॉल मध्ये भगवान विठठलाचा फोटो होता तेथे तिळमात्र नुकसान झाले नाही यावरूनच पांडुरग व कुटुंबाचे अतुट नाते अधुरेखित झाले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *