आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागाकडील असणाऱ्या गांवामध्ये बिबट्यांचा मोठा प्रमाणात वावर निर्माण झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . शेडगांव मध्ये तर गांवठाण सीमालगत सोनवणे यांच्या वस्ती जवळचं मंगळवारी मध्यरात्री दोन बिबट्याची झुंज झाल्याने वस्तीवर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

गेल्या अनेक दिवसापासून शेडगांव व परिसरात बिबट्यांचा धुमाकुल निर्माण झाला असून कुत्रे , शेळ्या यांना बिबट्या संध्या टार्गेट करत आहे चार दिवसा पुर्वी एका शेतकऱ्यांच्या बंदिस्त गोठयात जम्प मारुन बोकड्याची शिकार केली . मात्र शिकार करत असताना शेतकरी बंगल्या गॅलरीतून हे दुष्य बघत असताना त्यांचे लाल बुंद डोळे बघून शेतकऱ्यांची त्याला हुसकविण्याची हिंमत झाली नाही .

तर सोमवारी पुर्व भागात वादळासह वीजेच्या कडकड्यात अवकाळी पावसाने मोठे थैमान घातल्याने वीजे मोठा लंपडाव निर्माण झाला असातचं रात्रीच्या वेळेवर बाहेर झोपावे तर पाऊस व बिबट्यांची भीती तर घरात झोपावे तर गर्मी मछर चा प्रादुर्भाव अशातच गावठाणच्या सीमेवर असणाऱ्या सर्जेराव सोनवणे यांच्या बंगल्या जवळचं रात्री २ वाजेल्याच्या सुमारास डरकाळ्या आवाज आला असता सर्जेराव सोनवणे यांनी आपल्या नातेईकांना झोपेतून उठवून त्यांना सावध करत बंगल्याच्या टेरेसवर जावून बघितले तर दोन बिबट्यांची हद्दी व शिकारीकरिता झुंज चालू असल्याचे दिसले मात्र सावध होवून फटाके वाजून व विटा फेकून बिबट्याला तेथून पळून लावले मात्र हे बिबट्या पुन्हा नक्की येणार असल्याने सोनवणे वस्तीवर दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने येथे त्वरी पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे .

दोन बिबट्यांमध्ये झुंज होणे ही एक सामान्य घटना असून आपल्या हद्दीसाठी किंवा शिकारीसाठी काही वेळा, बिबट्या एकमेकांना मारतात, तर काहीवेळा ते गंभीर जखमी होतात. बिबट्यांची झुंज त्यांच्या भूभागावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, किंवा अन्नाच्या संसाधनांसाठी होऊ शकते. तेव्हा अर्धवट राहिलेली झुंज ही पुन्हा होवू शकते तेव्हा त्वरीत पिंजरा लावून या बिबट्यांचा बदोबस्त करावा
सौ रुपाली सोनवणे ( तालुकाध्यक्ष , रिपाई महिला आघाडी संगमनेर )
