स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसह विविध विषयावर चर्चा
विविध पदावर कार्यकर्त्यांची नियुक्त्या !
कर्जत । झुंजार न्यूज
सोमवार दि. 26/05/2025 रोजी शासकीय विश्रामगृह कर्जत या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या तसेच येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात रणनीती ठरवण्यात आली.

कर्जत तालुक्यातील राखीव जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया साठी महायुतीने सोडावी तसेच त्या जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लढवाव्यात असे ठरले. ॲट्रॉसिटी ॲक्ट विरुद्ध कलम 395 दरोडा हे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे हा सर्व प्रकार थांबवण्यात यावा तसेच या प्रकारा विरुद्ध सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीव्र असंतोष होता. अशा प्रकारचे खोटे गुन्हे जर दाखल झाले तर रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारून आंदोलन करण्यात येईल.

कर्जत तालुक्यातील गायरान जमिनी वरील राहत असणाऱ्या रहिवासांना त्या ठिकाणचा मालकी हक्क देण्यात यावा यावर चर्चा झाली. रमाई घरकुल योजनेची साठी आलेली रक्कम एफ डी स्वरूपात ठेवली असून तिचे व्याज नगरपंचायत वापरत असून घरकुलधारकांना रक्कम न देता नगरपालिका स्वतःसाठी वापरत आहे यामुळे रमाई आवास योजनेची रक्कम त्वरित घरकुलधारकांना देण्यात यावी. रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत रक्कम आदान न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन कर्जत शहरात छेडण्यात येईल.

कर्जत नगरपंचायत मध्ये एकूण कर आकारणी पैकी पाच टक्के रक्कम मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी वापरण्यात यावा असा शासन निर्णय असताना सुद्धा कर्जत नगरपंचायत हा निधी खर्च करत नाही तसेच सर्व निधी मागासवर्गीय समाज विकासासाठी वापरण्यात यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती.

यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश (अण्णा) भैलुमे , माजी जिल्हाध्यक्ष संजय शाहूराव भैलुमे , जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम , युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे , रामकिसन साळवे आदीसह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

तालुक्यातील शाखाध्यक्ष कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये राशीन शहराध्यक्षपदी नितीन साळवे, उपाध्यक्षपदी शरद आढाव, कर्जत शहर उपाध्यक्ष अजय सतीश भैलुमे,कर्जत शहर युवक उपाध्यक्षपदी अमजद शेख ,कर्जत शहर कार्याध्यक्षपदी युवक धीरज पवार, राशीन युवक शहराध्यक्ष विकी अडसूळ, राशीन युवक उपाध्यक्ष अविनाश साळवे, चापडगाव शहराध्यक्ष गणेश विष्णू सोनवणे , निमगाव डाकू अध्यक्ष कांबळे, मलटण शहराध्यक्ष बाळासाहेब वाघमारे ,येसवडी शहराध्यक्ष राजेंद्र कांबळे, खेड शहराध्यक्ष दादा शिंदे, नितीन चव्हाण कर्जत युवक तालुका उपाध्यक्ष, ईश्वर चव्हाण भोसा शहराध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रमिला महादेव शेटे, मधुकर लोंढे कर्जत तालुका मातंग आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , तालुका उपाध्यक्ष शहाजी साळवे, जवान भैलुमे कोरेगाव शहराध्यक्ष या निवडी करण्यात आल्या.

प्रा. विक्रम कांबळे, अवि चव्हाण, रामकिसन साळवे,सिद्धार्थ धावडे, दीपक सोनवणे, अनिल गंगावणे, शाम कांबळे, सागर कांबळे, रमेश आखाडे, विजय भैलुमे , रामलिंग कांबळे,कुंदन भैलुमे, विजय भैलुमे, संतोष आखाडे, पोट वाघमारे,विष्णू चव्हाण, मनोज सोनवणे, ललित सोनवणे, तुषार धावडे, अक्षय कांबळे, राहुल सोनवणे, संकेत तुपेरे, दत्ता भैलुमे, सार्थक भैलुमे , सनी भैलुमे, सार्थक भैलूमेचंद्रकांत कांबळे, विनोद थोरात, प्रशांत होले, सिद्धार्थ कदम, रोहित कांबळे, इम्रान शेख, वृषिकेश भैलुमे, वृषिकेश वाघमारे, पिंटू कांबळे, इंद्रजीत आढाव,विशाल चव्हाण यांच्यासह कर्जत शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
