Oplus_131072

 

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल दिपक साळुंके याची आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये १५ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर सेंट किटस अँड नेव्हिस या कॅरिबियन बेटांवर नोकरीसाठी निवड झाली. आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर ही संधी मिळवली.

प्रज्वल म्हणाला की , अमृतवाहिनी एम.बी.ए मध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व व्यक्तीमहत्व विकास  केला जातो. महाविद्यालयामध्ये नियमित वेगवेगळया क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, मॉक इंटरव्हयु असे अनेक उपक्रम घेतले जातात. अमृत ट्रॉफीच्या माध्यमातुन विद्यार्थ्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व, बिझनेस क्वीज, बिझनेस स्कील, मॅनेजर्मेन्ट विषयावरील अॅड शो, सिनेमा अॅट्रोग्राफी, डेटा अॅनेल्टीक्स अशा प्रमाणे अनेक उपक्रम राबविले जातात. याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समन्वय व नेत्वृत कौशल्य यांची वाढ होते व त्यामुळे व्यावसायाभिमुख विद्यार्थ्यांची जडण घडण होते. यासर्व गोष्टीमुळे माझी निवड झाली आहे.   

प्रज्वलचे माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात , संस्थेचे विश्वस्त मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख, इंद्रजितभाऊ थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अनिल बी. शिंदे, मॅनेजर प्रा. व्हि.बी. धुमाळ शैक्षणिक संचालक डॉ. जे.बी. गुरव, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. एम.लोंढे व अमृतवाहिनी एम.बी.ए. महाविद्यालयातील सर्व स्टाफनी अभिनंदन केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *