जिह्यात एकमेव 35 % गुण मिळविलेली विदयार्थ्यांनी रहीमपूरची
मेहनत व सातत्य ठेवल्यास यश निश्चितचं : के के जाधव
रहीमपूर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील भिमाजी आंबूजी शिंदे बिरोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी , बारावी कला व विज्ञान या वर्गामधील विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेल्याने त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला .

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी मध्ये पहिले पाच क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार तसेच विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागतोस्तव अशा दुहेरी स्वागत , सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य के के जाधव म्हणाले की ,विद्यार्थ्यांना शालेय जीवनाचे महत्त्व पटवून देतान कठोर मेहनत व सातत्य महत्त्वाचे असून त्यासाठी रहीमपूर विद्यालय हे नेहमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे तर विद्यालय व जूनियर कॉलेजच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असून त्यामध्ये सर्व शिक्षकांची ,स्थानिक स्कूल कमिटी व ग्रामस्थाची महत्वाची साथ मिळत आहे

सन्मानाची बाब म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थिनी कु . प्रिया किरण मोरे ही रहीमपूर विदयालयांची असल्याने एक अभिमानाची बाब आहे त्यामळे संपूर्ण गावांच्यावतीने तीचा सन्मान करण्यात आला.


