संगमनेर | झुंजार न्यूज 

 
तालुक्यातील अमृतवाहिनी आय.टी.आय. मध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी सदर कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या कार्यक्रमानिमित अमृतवाहिनी आय.टी.आय. मध्ये तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले. सदर तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी रिमोट द्वारे केले. या उद्घाटनासाठी संस्थेचे मॅनेजर व्ही.बी.धुमाळ, संस्थेचे अकॅडेमीक डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव, अमृतवाहिनी आय.टी.आय.चे प्राचार्य व्ही.व्ही. भाटे, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील सिव्हील विभागातील प्रा.चेतन कडलग, अमृतवाहिनी आय.टी.आयचे सर्व स्टाफ,विद्यार्थी व पालक हजर होते. या कार्यक्रमानिमित आयटीआय मध्ये  पालकांचा सत्कार करण्यात आला. 
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळावे, यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी आय.टी.आय. ची स्थापना १९८४ साली केली. संस्थेने गुणवत्तेत सातत्य राखल्याने संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. येथील शैक्षणिक वातावरण, निसर्ग सुंदर परिसर,शिस्त,स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. चेतन कडलग यांनी पर्यावरण व संरक्षण विषयावर आपले व्याख्यान दिले. व्याख्यानात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला होता. आज त्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण झालेली आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कौशल्य विकास विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय व अशासकीय आय.टी.आय.मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस व कौशल्य विकास मंत्री मा.ना. .मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला आहे.
     
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोरे यांनी केले तर आभार प्राचार्य व्ही.व्ही.भाटे यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आहे.
     
 
तसेच अमृतवाहिनी आय.टी.आय.साकुर व आय.टी.आय. तळेगाव दिघे येथेही स्वतंत्र पणे शिवराज्याभिषेक दिन उत्साह साजरा करण्यात आला.
आय.टी.आय.साकुर चे प्रा. मा.श्री.नामदेव गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.येथे प्रमुख अतिथी म्हणून दिपक भोसले ( श्रीराम उद्योग समूह ) व आदिनाथ खेमनर ( युवा उद्योजक )कार्यक्रमास लाभले.प्रमुख वक्ते आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलचे विनय भडांगे यांनी पर्यावरण व संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले. आय.टी.आय.तळेगाव दिघे येथे .विजय गडाख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी म्हणून .सोपानराव दिघे कार्यक्रमास लाभले.प्रमुख वक्ते श्री.संत गाडगे महाराज आवजीनाथ विद्यालय मिरपूर लोहारे मुख्याध्यापक उत्तम नाना वर्पे यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर व्याख्यान दिले.
तसेच अमृतवाहिनीच्या तीनही आय.टी.आय.च्या ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट
मिळाली त्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच तंत्र प्रदर्शनामध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.
     
सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे  संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री लोकनेते  बाळासाहेब थोरात , विश्वस्त मा..डॉ.सुधीरजी तांबे  विश्वस्त सौ.शरयू देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर व्ही.बी.धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव,आय.टी.आयचे प्राचार्य .व्ही.व्ही.भाटे यांनी अभिनंदन केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *