आश्वी | झुंजार न्यूज

गेल्या दोन अडीच महिने कपाटात विसावलेला शाळेचा गणवेश अंगावर चढवला.. तर शाळेच्या विश्वात पहिल्यांदाच पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्यांनी नव्याकोऱ्या गणवेशाची नवलाई अनुभवली. पुस्तकांचा खास गंध श्वासात भरून घेतला.. सुट्टीत मामांच्या गावाला गेलेल्यांनी दप्तर, डबा यांच्याशी नव्याने मैत्री केली.. कुणी मित्रांसोबत, कुणी मोठ्या भावासोबत, कुणी पप्पाच्या स्कूटरवरून, तर कुणी आईचं बोट धरून शाळेत आले. अन् तेथे संपूर्ण गावातून लेझीम व ढोल ताश्याच्या गजरात व मोठया जल्लोषात झालेले स्वागत पाहून चिमुकले विद्यार्थी भारावून जात नाचू लागले. हे चित्र होते सोमवारी जिल्हाभरात मोठ्या जल्लोषात साजऱ्या झालेल्या शाळा प्रवेशाचे, अर्थात शाळेच्या पहिल्या दिवसाचे.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून ट्रक्टर टॉलीला फुगे, फुलांच्या माळा, झावळ्यान  सजवून नव विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गावातून विविध शालेय संदेश , ढोल ताश्याच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली उपसंरपच सुनिल मुन्तोंडे , राहुल मुन्तोंडे , संजय ( काळू ) मुन्तोंडे , प्रितम मुन्तोंडे , बाळासाहेब कांबळे ,  मुख्यध्यापिका श्रीमती सविता भुसाळ , बाळासाहेब वाकचौरे , सताराम  पिचड , हेमत मुठे , सोमनाथ मुन्तोडे , लहानभाऊ नागरे , सौ पूनम मुन्तोंडे , सौ स्वाती गायकवाड , सौ जया साळवे , तबसूम पठाण , डॉ रोहीत मुन्तोंडे शुभम मुन्तोंडे , करण पवार , अमोल मुन्तोंडे , स्वस्कार मुन्तोंडे , शाहिल शेळके , गणेश जाधव , अन्वर शेख आदींसह पालक, स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते. 
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अंगणवाडीतून नव्याने दाखल झालेल्या पहिलीच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसत होता 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोंडे म्हणाले की , संध्या लोकांचा कल हा इग्लीश स्कूलकडे वाढत चालल्याने जिल्हा परिषद शाळेला विदयार्थ्याच्या पट होत असल्याने चिंता व्यक्त केली मात्र जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणांचा दर्जा ही चांगला झाला असून येथील विदयार्थी हा मोकळ्या वातावरणात चांगला घडतो तेव्हा शिक्षणाबाबत लोकांनी आपला दृष्टीकोन बदलून जिल्हा परिषद शाळेला महत्व दयावे असे आवाहन केले .
जिल्हा परिषद मराठी शाळे बाबत लोकांनी आपला दृष्टीकोन बदलून आपल्या विदयार्थ्याना मराठी शाळेतचं पाठवावे तर पट वाढण्याकरिता ग्रामपचायतीच्या माध्यमातून लोकांना मिळत असलेली पाणी अथवा घरपट्टी माफ करण्याचे ठराव करण्यासाठी प्रयत्न करणार
सुनिल मुन्तोंडे ( उपसंरपच , शिबलापूर ग्रा प )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *