आश्वी | झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप सरपंच सौ संगीता गीते यांच्या हस्ते करण्यात आले

 

 

Oplus_131072

 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे होते . व्यासपीठावर जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते , सोसायटीचे चेअरमन सिताराम पाटील दातीर ,रामदास दातीर ,  ज्ञानदेव गिते मुख्याध्यापक तायगा शिंदे आदि होते .

 

 

 

या प्रसंगी बोलताना भारतराव गीते म्हणाले विखे परिवार हा पद्मश्री पासून सहकार राजकारण समाजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी झटत असतो आजही महाराष्ट्र मध्ये विखे पॅटर्न एक विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखला जातो पिंपरी लौकी गावाचा सर्वांगीण विकास जलसंपदा मंत्री ना विकी पाटलामुळे झाला आहे आज खेडोपाडी शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम स्वर्गीय पद्मभूषण खासदार साहेबांनी केले . त्यांचाच वारसा आज भक्कमपणे नामदार विखे पाटील पुढे चालवित आहे . समाजाचं सर्वांगीण विकासाचे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे विखे परिवार आजही तितक्याच आत्मीये तेने समाजासाठी झटत आहे .

 

 

त्यांनी याप्रसंगी पिंपरी लौकीअजमपुर गावातील विविध संस्थांच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

 

 

याप्रसंगी प्रसंगी ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व शालेय साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उंबरकर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक तायगा शिंदे यांनी मांडले

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *