आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

युवा नेते डॉ सुजय विखे पाटील हे राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत एक महिला शेतकरी भुईमुगाच्या शेंगा काढणीचे काम करीत होत्या. या महिलेने अतिशय साधेपणाने “या ना दादा शेतात… थोड्या शेंगा खा!” म्हणून बोलावल्याने डॉ सुजय विखे पाटील हे तेथे क्षणाचा विलंब न करता थांबून त्या शेतकरी महिलेशी आपुलकीने शेती , पाणी व पिकाबाबत संवाद साधल्याने एक माणुसकीचे दर्शन दिसून आले .

 

 

 

 

या भेटी दरम्यान शेतकरी महिलासह डॉ सुजय विखे पाटील यांचा यातून साधेपणा दिसून आला . शेतकरी महिलांनी मारलेल्या हाकेने डॉ विखे पाटील यांच्या कडून दाद मिळाल्याने महिल्यानी ही आपुलकीने स्वागत केले . ही आपुलकी डॉ विखेच्या मनाला भावल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा आपल्याप्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेल्याने तत्काळ शेतात जावून व जमिनीवर बसून मातीचा गंध व शेंगाचा आस्वाद घेत माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिसून आला .

 

 

 

महिला व मुले यांच्याबरोबर पीक, पाणी आणि इतर गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या , ही फक्त एक भेट नसून माणुसकीची, मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती. एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली.

 

 

डॉ सुजय विखे पाटील

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed