पानोडी | झुंजार न्यूज

 

 

 

 

पानोडी – हजारवाडी रस्त्यालगत असणाऱ्या रामदास बापू बर्डे यांच्या शेताच्या बांधावरील चंदनाचे झाडचं अज्ञात चोरट्यांनी तोडून नेल्याने परिसरात चंदनचोर पुन्हा सक्रिय झाल्याने चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.

 

oplus_1024

पोलिस व वनविभागाने आश्वी व परिसरातील सक्रिय झालेल्या चंदनचोरांच्या वेळीच मुसक्या आवळा नाही तर त्यांचे फावेल. तेव्हा चंदनचोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

oplus_48

पानोडी – हजारवाडी रस्त्यालगत रामदास बर्डे यांच्या यांच्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीतून शुक्रवार दि. २० जून रोजी रात्रीतून चंदनाच्या झाडाचा खालचा भाग चोरट्यांनी कापून नेला आहे. झाडाच्या वरील भाग तसाच ठेवण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या बांधावरील झाड्याच्या बुंध्याला हत्यार लावल्याचे ओळखण दिसून येत असल्याने काही तरी कारणावरून ते चंदनाचे झाड वाचले असले तरी त्याच्यावर ही डल्ला मारला जावू शकतो तेव्हा चंदनचोरांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी बर्डे यांच्यासह परिसरातून शेतकरी करत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed