तो आला त्याने बघितले फोटोसाठी पोज दिली व तो पुन्हा आडोशाला उभा राहीला

 

 

 

आश्वी l झुंजार न्यूज 

 

 

 

तो आला त्याने बघितले फोटोसाठी पोज दिली व तो पुन्हा आडोशाला उभा राहीला. पिचर मधिल एखाद्या हिरो हिराईन ला लाजवेल अशा पध्दीतीने आश्वी खुर्द ते दाढ खुर्द (ता.संगमनेर) रस्त्यावर न्याय दुध संस्थेच्या शेजारील शेतामध्ये चक्क बिबट्या बगळ्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता.

 

 

 

Oplus_131072

 

वेळ साधारण संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास आश्वी खुर्द ते दाढ खुर्द रस्त्यावर न्याय दुध संस्थेच्या लगत साहेबराव दातीर यांच्या शेतात अभिषेक भवर हा तरुण शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरत होता तर नांगरलेल्या शेतात बगळे कीटकांना टिपत होते शेजारी उस क्षेत्र ट्रॅक्टर व उस क्षेत्राचे अंतर फक्त पाच फुटाचे त्या उसाच्या मध्ये बिबट्या बगळ्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसलेला होता.

 

 

Oplus_131072

 

शुटिंग साठी पोज देत राहीला एक मिनिटाची शुटींग झाल्यानंतरही बिबट्या मागे हटला नाही तसाच सरीत बिबट्याने बसुन घेत अभिषेकला फोटो काढण्याची संधी देत होता.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये,बिबट्या शांतपणे उभा दिसत आहे आणि नंतर तो बाजूला झाला,बिबट्याच्या नैसर्गिक दर्शनाने या शेतकऱ्याने मानसिक समाधान व्यक्त केले.

 

 

Oplus_131072

मी आज पर्यत शेतात नागरटी करतान शेकडो बिबट्या बघितले आहे. खरा तर तो एक वन्य प्राणी आहे.तो स्वतःच्या जिवाला घाबरत शिकार करताना मी अनेकदा बघितले.बहुदा आज हा बिबट्या भुकेला होता त्या मुळे एका झेपेत त्यांने एक बगळा पकडला शिकार फस्त करून, तो पुन्हा बाहेर माझ्या दिशेने येतांना दिसला त्यामुळे मी लगेच ट्रॅक्टर शेतातून बाहेर घेऊन निघालो.त्या दरम्यान त्याचा माबाईल मध्ये व्हिडीओ काढला.

अभिषेक भवर,शेतकरी,आश्वी खुर्द

 

 

 

Oplus_131072

 

बिबट्या दिसणे हे सामान्यत एक शक्तिशाली शकुन मानले जाते अनेकांचा असा विश्वास आहे की ते संरक्षणाचे आणि कठीण काळात मार्गदर्शनाचे आगमन दर्शविते काहींसाठी बिबट्याला भेटणे म्हणजे लपलेल्या भिंतींना किंवा आव्हानाला तोंड देण्याचे आवाहन असु शकते तर काहींसाठी ते सौभाग्याचे आणि मार्गदर्शक आत्म्याच्या उपस्थितीचे लक्ष आहे. सध्या उस क्षेत्र संपले आहे बऱ्याच शेतकऱ्यानीं घराला कंपाऊड केले आहे त्यामुळे बिबट्या अन्न व सुरक्षित क्षेत्र शोधत असुन शेतकऱ्यांचा व बिबट्यांचा दिवसा समोरासमोर सामना होत असल्याने आश्वी परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ले केले आहे.हाच बिबट्या पुढे हिंसक होऊ शकतो अशी शंका येथील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

 

 

 

Oplus_131072

बिबट्या दिसल्यास, घाबरून किंवा गोंधळून न जाता शांत राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा आणि मोठ्याने आवाज करा. बिबट्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. जर तुम्ही सुरक्षित ठिकाणी असाल, तर तिथेच थांबा आणि बिबट्या निघून गेल्यावरच बाहेर पडा.बिबट्या दिसल्यास, त्वरित वनविभागाला संपर्क साधा आणि त्यांना माहिती द्या.

 

 

सुभाष सांगळे,वनपरीक्षेत्र अधिकारी,संगमनेर भाग ३

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed