संगमनेर | झुंजार न्यूज

 

संगमनेर मधील सिद्धार्थ विद्यालयात चि. रियांश याचा सहावा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात 

 

रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मधुकर जाधव म्हणाले की , शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. भगवान गौतम बुद्ध ,थोर वैज्ञानिक एडिसन, डॉ. स्टीफन हॉकिंग यासारख्या अनेक महामानवांनी जीवनभर ज्ञान मिळवण्यासाठी मोठे कष्ट घेतले. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी समाज उभारणीसाठी केला. म्हणूनच त्यांची कीर्ती आणखी हजारो वर्ष जगभर राहणार आहे. असे ते म्हणाले.

 

 

Oplus_131072

 

 

स्वतः आपण एका सामान्य कुटुंबातून शिकून पुढे आलो, प्रचंड कष्ट केले आणि स्वतःचा व्यवसाय भरभराटीला आणला .यामागे शिक्षण, आणि परिवाराची साथ हीच प्रेरणा होती असेही त्यांनी नमूद केले. आपल्या पाल्यांमध्ये सामाजिकता,पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्याचे संस्कार आणि मूल्ये रुजवण्यासाठी असे सर्व समावेशित सार्वजनिक कार्यक्रम होणे अपेक्षित आहे यावर त्यांनी जोर दिला. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षरोपण करण्यात आले.

 

Oplus_131072

 

याप्रसंगी सिद्धार्थ विद्यालयातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. रमा यशोधरा विद्यार्थ्यांनी आश्रम आणि सिद्धार्थ विद्यार्थी वसतीगृह या दोन्हीही वसतिगृहांना धान्य स्वरूपात मदत दिली कार्यक्रमासाठी चि. रियांश, पूजा मधुकर जाधव, जिया मधुकर जाधव, दीपक जाधव, किरण जाधव, मधुकरराव सोनवणे,विनोद गायकवाड , राजेंद्र भालारे, जाधव ,बाळासाहेब जाधव, के.जी. भालेराव, चंद्रकांत खरात , अमोल रोकडे, सुनील यादव, अग्नेश पंडित सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथराव जगताप सर, बाळासाहेब राऊत ,तुषार थिटे सुशांत रूपवते ,दत्तात्रय गोफणे, सीमा वाघ, गर्जना गांगुर्डे , नंदकुमार भालारे तसेच सर्व शिक्षक वृंद, रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Oplus_131072

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रकाश पारखे यांनी केले.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed