आश्वी l झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या सह्याद्री बहुजन विदया प्रसारक संस्थेच्या अंभोरे येथील मल्हारराव होळकर विदयालयाचे प्राचार्य शिवाजीराव बाबुराव सोसे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तसेचं ग.भा. बबाबाई बाबुराव सोसे यांचा कृतज्ञता सोहळा रविवार दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिबलापूर येथील ” लक्ष्मी लॉन्स “ ( आश्वी – शिबलापूर रस्ता ) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे .

शिवाजीराव सोसे यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध गावांमधील विदयालयातून विदयार्थ्यांना ज्ञान देवून घडविले .त्यांच्या या अमूल्य योगदानाचे कौतुक झाले . “शिक्षकाचे समाजात एक उदात्त स्थान असते, तो विदयार्थ्याच्या , तरुणांच्या मनांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो सोसे सर हे निवृत्त शिक्षक सह्याद्री संस्थेचे होतकरू स्तंभ असून त्यांनी वचनबद्धता आणि उत्कृष्टतेने सेवा दिली . समाजप्रती व शिक्षणप्रती एकनिष्ठता व प्रामाणिकता त्यांच्यामधून दिसून आली . त्यांना मिळालेल्या आई रूपी संस्कारातून त्यांनी आपले उभे आयुष्य हे विदयार्थी घडविण्यात घालविल्याने सेवापूर्ती बरोबर कृतज्ञता सोहळा ही साजरा होत असल्याने आपला सत्कार सोहळा हा आई वडीलांनी घालून दिलेल्या संस्काररूपी सन्मानाचा असतो .

.
त्यांच्या होणाऱ्या सोहळ्यास शिरुर येथील सिध्देश्वर संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वेदांताचार्य महंत विवेकानंद महाराज शास्त्री यांचे जाहिर किर्तन होईल तर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात , सहयाद्री संस्थेचे अध्यक्ष डॉ सुधीर तांबे , संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आदी मान्यवरांसह मोठया संख्येने विविध संस्थेचे पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत .
.

.
तरी तालुक्यातील हिंतचितकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
Post Views: 966
