पिंप्री लौकी । झुंजार न्यूज

 

 

पिंप्री लौकी अज मपुर गावचे सुपुत्र व मुंबई येथील उद्योगपती बाजीराव आनंदराव गीते व त्यांच्या परिवाराकडून प्रवरा माध्यमिक विद्यालय पिंपरी लौकी अजमपुर या विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या आश्वी केंद्रात प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना व विद्यार्थ्याला शालेय साहित्याचे वाटप सरपंच सौ संगीता गीते व बाजीराव गीते सौ नयना गीते यांच्या हस्ते करण्यात आले .

 

 

याप्रसंगी प्रवरा माध्य विद्यालयाचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब लावरे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारतराव गिते संविधान ग्रुपचे विजय कदम चांगदेव कदम बाजीराव कदम मुरलीधर कदम मुख्याध्यापक तायगा शिंदे सह शिक्षक वृंद उपस्थित होते .

 

 

 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना भारतराव पाटील गीते म्हणाले शाळा हे मंदिरा असून ते जपण्याचे काम सर्वांचे आहे एक मुलगा एक मुलगी शिकली तर ती कुटुंब मोठे करते ही ताकद फक्त शिक्षणात आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे . शाळेमधील हे जिवंत देव जपण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे प्रवरा माध्यमिक विद्यालय या विद्यालयांमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक विकास कामे मार्गाला लागली आहेत भविष्य काळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून शाळेची पक्की इमारत बांधण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती पाठपुरावा करीत आहे त्याला लवकरच यश येईल असं आशावाद त्यांनी व्यक्त केला ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यालयाचा चेहरा मोहरा बदलण्यात आला आहे .

 

 

Oplus_131072

 

या शाळेमध्ये शिकून आज उच्च पदावर असणारे अनेक जण या विद्यालयाला मदत करत आहेत यांचीही त्यांनी आभार मानले या प्रसंगी ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी एकत्र येऊन जी जी कामे करणे शक्य आहे ती करण्यासाठी मदत करावी असे आव्हान केले . उद्योगपती बाजीराव पाटील गीते यांनी शालेय विद्यार्थ्यांना साहित्याची वाटप केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले व शाळेच्या मदतीसाठी यापुढेही त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले .

 

 

 

Oplus_131072

 

विद्यालयाच्या वतीने उद्योगपती बाजीराव गीते व सौ नयना गीतेया उभयतांचा सत्कार करण्यात आला .
प्रस्तविक मुख्याध्यापक श्री तायगा शिंदे यांनी केले .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed