आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी

 

 

 

संगमनेरातील गटार दुर्घटना प्रकरणी

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर भूमिगत गटारीच्या साफसफाईचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, आणि हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी या दोघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधान सभेत केली.

 

 

 

 

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अतुल पवार याच्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमा नुसार ३० लाख रुपये आर्थिक मदत मिळत आहे .मात्र, रियाज पिंजारी याने जीवाची पर्वा न करता पवारच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना ही शासनाने भरीव स्वरूपात आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

 

 

 

Oplus_131072

 

गटारीतील मैला हाताने साफ करण्यास प्रतिबंध आणि पुनर्वसन करणारा २०१५ चा कायदा अस्तित्वात असतानाही त्या ठेकेदाराने या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सुरक्षा उपाययोजना पूर्णतः धाब्यावर बसविण्यात आल्या होत्या. चेंबरमधील मैला साफ करण्याचे काम यंत्रसामग्रीच्या साह्याने करणे गरजेचे असताना त्या ठेकेदाराने अतुल पवार यास कोणती ही सुरक्षा उपकरणे न देता त्याला चेंबरमध्ये उतरवले. चेंबरमधील विषारी वायूमुळे पवार यांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला वाचविण्या साठी गेलेला रियाज यालाही जीव गमवावा लागला. या घटनेमुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर संगमनेर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असला तरी, भविष्यात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे आमदार खताळ यांनी विधानसभेत ठामपणे सांगितले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *