नेत्या भोवती तांबे , हिंगेसह इच्छुकांची रेलचेल सुरु झाल्याने पुन्हा एकदा विखे – थोरात सामना !
आश्वी । झुंजार न्यूज
गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पहिले पाऊल सोमवारी टाकले गेल्याने नेत्यासह इच्छुक कार्यकर्त्यांना दिवसाढवळ्या स्वप्न पडू लागली असून संगमनेर तालुक्यातील आश्वी जिल्हा परिषद गट हा सर्व साधारण पुरुष होणार अशी चर्चा परिसरात होत असल्याने इच्छुक कार्यकर्त्यांची रेलचेल सुरु झाल्याचे दिसू लागले असले तरी विखे – थोरात यांच्या भूमिकेकडे सर्व जिल्हयाचे लक्ष्य लागणार आहे .
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गट हा राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांचा सहकार क्षेत्रातील मोठा बाल्लेकिला समजला जात आहे दोन्ही आजी – माजी मंत्र्यांनी आप -आपल्या कार्यकर्त्यांची फौज तैनात केली असून हा गट निवडणुकीच्या दरम्यान प्रतिष्ठेचा ठरणार असून त्यामुळे सर्व साधारण पुरुषाला जागा निघण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यानुसार संध्यातरी थोरात यांच्याकडून (काँग्रेस ) विजय हिंगे, तर विखे पाटील ( भाजप ) कैलास तांबे , भारतराव गीतेयांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. उमेदवार कोणी ही असो मात्र विखे – थोरातामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे .
आश्वी जिल्हा परिषद गट हा प्रवरा ४० गाव परिसरातील येत असल्याने बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जात आहे. तर विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून व जुना ऋणानुबंधाने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव परिसरावर आहे.
थोरात-विखे एकत्र असो अथवा नसो, २०१९ पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे-थोरात काँग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
तेव्हा पासून विरोधाची पडलेली ठिणगी आजपर्यंत चालू असल्याने दोन्हीकडे जय – पराजयाची चव चाखली गेली . यातूनचं संघर्ष वाढत गेल्याने कुठलाही कार्यक्रम असो, एकमेकांवर टीकाटिप्पणी होताना दिसली मात्र विखे – थोरात साखर कारखान्यांच्या निवडणुकीत सहमतीचे बिनविरोधकांची भूमिका दिसल्याने आश्चर्य व्यक्त होवू लागले मात्र सहकारात राजकारण नको ही दोन्ही नेत्याची भूमिका ठरली आता दोन्ही नेत्यांची भूमिका वेगळी, पक्ष वेगळा असल्याने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रयत्न होणार यात तिळमात्र शंका नाही.
आश्वी जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नाही. विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित व सधन लोक आहेत. राजकारणाविषयी जाणकार आहे. हा बागायतदार भाग असताना सुद्धा विखे-थोरातांच्या भोवती वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्ते निर्माण केले. दोन्ही विधानसभेच्या सीमेवरील ही गावे आहेत. विकासात्मक कामे चढा ओढीने होताना दिसत आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत महिला राखीव आरक्षण होते. यात विखे गटाच्या अॅड. रोहिणी निघुते यांनी बाजी मारली होती . आता प्रदिर्घ काळ रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीला मुर्हुत लागल्याने अनेकांची इच्छा उफाळून आल्या हौसे – नौसे गवसे या -ना -त्या मार्गाने आपली इच्छा प्रगट करू लागल्याचे चित्र दिसू लागले आहेत .मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल सांगता येत नाही. विखे गटाच्या कैलासराव तांबे यांच्यासह भारतराव गिते, भगवानराव इलग, अॅड. पोपटराव वाणी, तबाजी मुन्तोडे, तर थोरात गटाकडून विजयराव हिंगे हे एकमेव नाव संध्या चर्चात दिसून येत आहे . तर मोहीत गायकवाड हे निवडणुकीच्या तयारीत असून वेळ आल्यास अपक्ष लढण्याच्या तयारीत दिसत आहे तर ही जागा महायुती धर्म पाळून रिपब्लिकन पक्षाला मिळावी ही भुमिका ठेवून आशिष शेळके यांच्या नाव सुध्दा चर्चेत आहे .
या गटामध्ये आश्वी बु॥ ( थोरात ) , निमगांवजाळी ( थोरात ) , चिंचपूर ( थोरात ) , सादतपूर ( विखे ) औरंगपूर ( थोरात ) , प्रतापपूर ( विखे ), मांची हिल ( थोरात ) , आश्वी खुर्द ( विखे ) , शिबलापूर ( थोरात ) , शेडगांव ( थोरात ), हंगेवाडी ( थोरात ) , पिंप्री लौकी अजमपूर ( विखे ) , झरेकाठी ( थोरात ) , खळी ( दोन्ही एकत्र ) , दाढ खुर्द ( विखे ) , चणेगांव ( थोरात ) , ही गांवे येत असून बहुतांश ठिकाणी थोरात गटाचेचं संरपच आहेत . मात्र विधानसभेला सर्वचं गांवामधून राधाकृष्ण विखे पाटील यांना मताधिक्क दिसून आले .
आश्वी जि प सर्वसाधारण पुरुष तर आश्वी बु॥ गण हा पुरुष तर आश्वी खुर्द ओ बी सी करिता महिला किंवा पुरुष होण्याची शक्यता असल्याने आश्वी बु॥ गणातून थोरातांकडून नवनाथ आंधळे , राहुल जऱ्हाड , माजी संरपच महेश गायकवाड , माजी संरपच विवेक तांबे , तर विखे यांच्याकडून मच्छिद्र थेटे , अनिल म्हसे , शिवाजी इलग , यांची नावे संध्या चर्चेत दिसून येत आहे तर आश्वी खुर्द गणातून थोरातांकडून शिबलापूर संरपच प्रमोंद बोंद्रे , डॉ संजय सांगळे , थोरात कारखान्यांचे संचालक दिलीप नागरे , सुरेश फड , तर विखे पाटील यांच्याकडून निवृत्ती सांगळे , भारतराव गीते , प्रा कान्हू गीते , सुरेश नागरे , दाढ संरपच सतिष जोशी यांची नावे चर्चेत आहेत .