{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

गुरुवार दि. १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता अमृतवाहिनी बँक सभागृह 

संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या वतीने ” आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्ताने ” सहकार दींडी व सहकार परिसंवादाचे आयोजन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेच्या सभागृहामध्ये गुरुवार दि. १७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती संगमनेर दूध संघाचे व्हा चेअरमन  राजेंद्र चकोर , कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी दिली आहे .

 

 

 

या सहकार दींडी व परिसंवाद कार्यक्रमाच उट्रघाटन नाशिक विभागीय सहकारी संस्थेचे उप निबंधक चंद्रशेखर बारी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह विजयसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे .

 

 

Oplus_131072

तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेत्या तथा एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात , थोरात कारखान्याचे व्हा चेअरमन पांडुरंग दामोधर घुले , अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी , कारखान्याचे संचालक इद्रजित भाऊ थोरात , कृ उ बा समिती सभापती शंकरराव खेमनर , संगमनेर शेतकी संघ चेअरमन संपतराव डोंगरे आदीसह सहकार क्षेत्रातील मान्यवर , विविध संस्थेचे संचालक , आधिकारी मोठया संख्येने उपस्थित रहाणार आहे .

 

 

 

Oplus_131072

तरी तालुक्याती सहकारी संस्थेतील पदाधिकारी , सभासद , दूध उत्पादक व शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ सुजित खिलारी यांनी केले आहे .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *