शिर्डी । झुंजार न्यूज
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा व पुरस्कार वितरण समारंभ उद्या दिनांक २० जुलै रोजी पार पडणार आहे .

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर,यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटक म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांचे हस्ते होणारा असून मा. खा . सुजय विखे , खा . भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके .येवला तालुक्यातील जलचिंतन सेलचे अध्यक्ष डॉक्टर मोहनराव शेलार, शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, शिर्डी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक महेश येसेकर ,शिर्डी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब कोते, शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू तथा दत्तात्रय कोते योगेश बनकर अविनाश निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके दता भालेराव रणरागीणी फाऊंडेशन च्या रोहिणीताई पवार , मा सरपंच भाऊसाहेब कातोरे, सरपंच कानीफ गुंजाळ रिपाईचे दिपक गायकवाड साई संस्थान चे सुरक्षा अधीकारी कैलास शेजवळ, प्रगतीशिल शेतकरी रामनाथ व शितलताई घोरपडे यांना गौरविण्यात येणार आहे .

सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रम प्रसंगी समाजात विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक राजकीय ,धार्मिक ,क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे . सदर कार्यक्रम सकाळी नऊ वाजता सुरू होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे . त्यादरम्यान आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत तसेच चर्चासत्र असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे, प्रदेश अध्यक्ष सुनील जाधव, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मनोज दुशिंग, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश साबळे,जिल्हासंघटक बाळासाहेब शिरसाठ,राहाता तालुका अध्यक्ष सुरेंद्र महाले, ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन राहता तालुकाध्यक्ष पंकज पाटील राहता महिला तालुका अध्यक्ष नयना शिरसाठ, राहता तालुका महिला उपाध्यक्ष सायली बनसोडे,शिर्डी महिला शहर अध्यक्ष रूपाली भोलाने,शिर्डी महिला शहर उपाध्यक्ष मायाताई आरणे, येवला तालुकाध्यक्ष बाजीराव देवडे,येवला तालुका कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे ,येवला तालुका समन्वयक बाबासाहेब बोंबले आदी प्रयत्नशील आहेत .
