विविध शासकीय योजनांचा फायदा मिळवून देतो असे पटवून बहुउद्देशीय संस्थेच्या नावाखाली करोडो रुपये लाटल्याचा प्रकार शिर्डीत घडला असून भामटा किरण नामदेव शेजवळ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आरोपी किरण शेजवळ हा शिर्डी येथे स्थायिक असून त्याने सन २०२० मध्ये ओळखीचा फायदा घेवून आपण बहुउद्देशीय संस्था रजिस्टर करून त्यामध्ये विविध शासकीय योजना मिळवून देतो अशी तोतयागिरी करत कोट्यावधी रुपयांची फसवणूकीचा घोटाळा समोर आला आहे .
गुंतवणूकदार रामदास बाबुराव वारकर रा . ता .कोपरगाव , विजय विठ्ठल अभंग भोजडे कोपरगाव, शरद शंकर सुपेकर संगमनेर, बाळासाहेब सोनवणे रा संगमनेर, सतिश यशवंत क्षिरसागर एकरूखे ता राहाता यांनी शेजवळच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे
सदर गुन्ह्यात आरोपी शेजवळ या अटक झाली असून शेजवळ याने तुम्हाला गाडी, शेत जमीन , आदी अमिषे दाखवून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रकमा घेत आला गुंतवणूकदारांनी आम्हाला आमचा परतावा कधी मिळणार अशी विचारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तर देवू लागला .
अखेर त्याचे कडून रक्कम मिळत नाही अशी खात्री पटल्याने पाचही गुंतवणूकदारांनी किरण शेजवळ यावर गुन्हा दाखल केला आहे . त्याला गजाआड करण्यात आले आहे .
दरम्यान आमची रक्कम आम्हाला परत मिळावी अशी विनवणी गुंतवणूकदारांनी केली आहे .