संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार थोरात विद्यालयात अहमदनगर लोकल बोर्डाचे माजी अध्यक्ष, सरदार शिवराव भवानराव थोरात यांची ६५ वी पुण्यतिथी आणि रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भगवानराव थोरात यांनी भूषविले.
यावेळी बोलताना भगवानराव थोरात यांनी सरदार शिवराव थोरात यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, सरदार थोरात हे करारी स्वभावाचे होते आणि लोकल बोर्डाचे अध्यक्ष असताना त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती.
कार्यक्रमादरम्यान रक्षाबंधनाचा सणही साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थी व शिक्षकांना राख्या बांधून भाऊ-बहिणीचे आणि गुरु-शिष्याचे नाते अधिक घट्ट केले.
या कार्यक्रमाला युवा नेते विनायकराव थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, मुख्याध्यापक सोनवणे, गणेश जाधव, कारभारी जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.