शिर्डी । झुंजार न्यूज

शिर्डी येथील साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय ‘टग ऑफ वार’ अर्थात रस्सीखेच स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बिहार, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, नागालँड, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा विविध राज्यांतील संघांनी सहभाग घेतला. अनेक संघांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.

 

 

कार्यक्रमासाठी टग ऑफ वार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिशंकर गुप्ता आणि सचिव मदन मोहन उपस्थित होते. तसेच, एमटीडब्ल्यूएच्या अध्यक्षा माधवी पाटील, सचिव जे. ई. गुपिले, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुहास आहेर आणि सचिव बाबा गायकवाड यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

 

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी साईबाबा शैक्षणिक संकुलातील विविध विभागांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य विकास शिवगजे, इंग्लिश मीडियमचे प्राचार्य असिफ तांबोळी, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शिल्पा पुजारी, कन्या शाळेच्या प्राचार्या मिरजकर, सिनियर कॉलेजचे प्राचार्य अवताडे, क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे, सुरक्षा अधिकारी कैलास शेजवळ , रोहीदास माळी , प्रशांत भालेराव , विजय पारधे , मोकळ आणि रवींद्र लोखंडे यांच्यासह शिक्षक वृंदाचा समावेश होता.

 

 

 

देशभरातून आलेल्या सर्व संघांनी साईबाबा संस्थानने केलेल्या या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक करत सुरक्षा आधिकारी कैलास शेजवळ यांच्या सन्मान करण्यात आला . या स्पर्धेमुळे शिर्डीच्या क्रीडा वैभवात भर पडली आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed