शिबलापूर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह उंबरेश्वर देवस्थान मठाधिपती ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार १३ ऑगस्ट २०२५ ते बुधवार २० ऑगस्ट २०२५ दरम्यान होत आहे. विशेष म्हणजे या सप्ताहास अनेक वर्षांची अखंड परंपरा आहे.

या सप्ताहा निमित्त हनुमान मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ९ वाजता कीर्तन सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे . नंतर ११ ते ४ हरिजागर होईल. पहिल्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलश पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला

बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी ह.भ.प. बाबासाहेब महाराज वाणी ( झरेकाठी ) , गुरुवार दि . १४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. हर्षल महाराज भागवत (लोणी) , शुक्रवार दि . १५ ऑगस्ट रोजी ह.भ.प. बाळासाहेब महाराज उंबरकर (उंबरी) , शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज कापडी (खांबे) , रविवार दि . १७ ऑगस्ट रोजी बालकीर्तनकार ह.भ.प. ईश्वरीताई नागरगोजे (जामखेड) , सोमवार दि. १८ ऑगस्ट रोजी ह.भ.प. नामदेव महाराज पऱ्हाड (आळंदी) , मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. जगन महाराज उंबरकर (उंबरी) आदी चे रोज सायंकाळी ७ वाजता हरिकिर्तन होणार असून बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ह भ प गायनाचार्य अरुण महाराज उंबरेकर ( शिरुर ) यांचे काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम होईल

तरी शिबलापूर व परिसरातील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली भजनी मंडळ , तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे .
