हजारवाडी । झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील हजारवाडी येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह उंबरेश्वर देवस्थान मठाधिपती ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार ०९ऑगस्ट २०२५ ते शनिवार १६ ऑगस्ट २०२५ दरम्यान होत आहे. विशेष म्हणजे या सप्ताहास अनेक वर्षांची अखंड परंपरा आहे.

 

या सप्ताहा निमित्त हनुमान मंदिर परिसराची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीमद्‌ भागवत कथा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ९ वाजता कीर्तन सोहळा होवून दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . नंतर ११ ते ४ हरिजागर होईल. पहिल्या दिवशी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत कलश पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला

शनिवार दि. ०९ ऑगस्ट रोजी ह.भ.प. बाळासाहेब महाराज उंबरकर ( उंबरी ) , रविवार दि . १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. सुनिल महाराज पवार ( ओझर ) , सोमवार दि .११ ऑगस्ट रोजी ह.भ.प. रमेश महाराज तांबडे ( डिग्रस ) , मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज  ( सरला बेट ) , बुधवार दि . १३ ऑगस्ट रोजी किर्तन केसरी संदिप महाराज नाईकवाडी , गुरुवार दि. १४ ऑगस्ट रोजी ह.भ.प. पुनम दीदी गोसावी  (आळंदी) , शुक्रवार दि. १५ ऑगस्ट रोजी वारकरी भूषण ह.भ.प. बाबा महाराज मगर  (उंबरी) आदीचे रोज सायंकाळी ७ वाजता हरिकिर्तन होवून महाप्रसाद होईल तर शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ह भ प वाणी भूषण अमोल महाराज पिसे यांचे काल्याचे किर्तन होवून महाप्रसादाचा कार्यक्रम होईल 

तरी पानोडी हजारवाडी व परिसरातील भाविकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन भजनी मंडळ , तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे . 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *