आश्वी । झुंजार न्यूज

जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ऑनलाइन रेशन यादीत नाव असलेल्या सर्व व्यक्तींना आयुष्मान कार्ड, तसेच ७० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान वय वंदना ई-कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. अतुल गुंजाळ यांनी केले आहे. 

 

Oplus_131072

 

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वि खुर्द येथे नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संरपच सौ अलका ताई गायकवाड , उपसंरपच बाबा भवर , भाजपा सर चिटणीस मोहित गायकवाड , ग्रामसेवक प्रविण इल्हे , सौ मंगल जोशी , सौ कामिनी तक्ते , आरोग्य मित्र गणेश पावबाके , बापूसाहेब गायकवाड , विठ्ठलराव गायकवाड , सुभाष गायकवाड , राम बबन शिंदे , भीमराज गागरे , सोपान सोनवणे , संजय भोसले , दत्ता गायकवाड , कैलास गायकवाड , विकास भडकवाड , दिपक दातीर , चेतन मालुंजकर , दिपक बिडव , आदिनाथ जाधव , आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते  या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 

योजनेचे प्रमुख फायदे:
आयुष्मान कार्ड: रेशनकार्डच्या ऑनलाइन यादीत नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रितपणे ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
आयुष्मान वय वंदना ई-कार्ड: ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ५ लाख रुपयांचे अतिरिक्त विमा संरक्षण केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे.
देशव्यापी उपचार: या कार्डधारकांना भारतभरातील योजनेंतर्गत मान्यताप्राप्त कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येतील.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पिवळे, केशरी आणि पांढरे रेशनकार्डधारक पात्र आहेत. अट केवळ एवढीच आहे की, त्यांचे रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कार्ड काढण्यासाठी केवळ मोबाईल क्रमांकाशी संलग्न (लिंक) असलेले आणि ओटीपी येऊ शकणारे आधारकार्ड गरजेचे आहे.
आयुष्मान भारत’ आणि ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ यांचा मिलाफ
जिल्हा समन्वयक डॉ. अतुल गुंजाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रितपणे प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण (IAS) आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात असून, आरोग्य क्षेत्रात मोठा दिलासा मिळत आहे.
घरबसल्या कार्ड काढण्याची सोय
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) तयार केलेल्या ‘BIS 2.0’ या अँड्रॉइड मोबाईल ॲपद्वारे लाभार्थी स्वतः आपले ई-कार्ड बनवू शकतात.
ॲप डाउनलोड लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiary
या ॲपद्वारे लाभार्थी स्वतः (Beneficiary Login) किंवा सीएससी (CSC) केंद्रचालक, आपले सरकार सेवा केंद्रचालक आणि आशा सेविका (Operator Login) यांच्या मदतीने आधार ओटीपी किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-कार्ड तयार करू शकतात.
ज्यांना ॲप वापरणे शक्य नाही, ते जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात, आशा सेविकेकडे किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन आपले कार्ड काढून घेऊ शकतात. डॉ. गुंजाळ यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःचे तसेच आपल्या परिसरातील गरजू व्यक्तींचे ई-केवायसी (e-KYC) करून घेऊन या योजनेचा लाभ मिळवावा.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *