आमदार सत्यजीत तांबे यांना बहीण डॉ.जयश्रीताई थोरात यांनी बांधली राखी

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा हा सण जगाला आदर्शवत असल्याचे गौरवदगार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
रक्षाबंधनानिमित्त नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या निवासस्थानी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रक्षाबंधन केले. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आदींसह विविध पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांना राखी बांधली.
याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये मोठी विविधता आहे. विविध परंपरा सण मोठ्या आनंदाने आपण साजरे करतो. यामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि निस्वार्थी प्रेमाचा संदेश जगाला देणारा हा आदर्शवत असा सण आहे. आदर्श कुटुंब पद्धती निर्माण करणारी ही संस्कृती आहे. प्रत्येक महिलेचा सन्मान झालाच पाहिजे मात्र महाराष्ट्रात लाडक्या बहिणी यांच्या जीवावर राजकारण होणे अत्यंत दुर्दैवी आहे.
संगमनेर मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहत आहे.  सण मोठ्या उत्साहाने साजरे करत आहे. आज सर्व धर्माच्या भगिनी इतर धर्माच्या भावांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधतात ही आदर्श परंपरा नक्कीच कौतुकास्पद आहे.
महिलांचे शिक्षण महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक भावाचे कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असून आदर्श परंपरा जपताना देशात आणि समाजात बंधुभाव वाढीस लागेल यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, युवा पिढी अनेक सण साजरी करत आहे. मात्र बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण सर्वांसाठी अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचा आहे. याप्रसंगी मा.आ.डॉ. सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे व कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहर व तालुक्यातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी रक्षाबंधनानिमित्त तालुक्यातील अनेक युवकांना राख्या बांधल्या. युवक काँग्रेस सह विविध पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी येऊन डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याकडून राखी बांधून घेतली. युवकांची मोठी उपस्थिती हे या रक्षाबंधनाचे वैशिष्ट्य ठरले आहे. युवकांनी एक वही बहिणीसाठी हा उपक्रम राबवला. यावेळी रक्षाबंधनानिमित्त ओवाळणीमध्ये युवकांनी डॉ. जयश्रीताई थोरात यांना एक वही दिली. या सर्व एकत्रित नोटबुक ( वही ) तालुक्यातील गरीब मुलींना देण्यात येणार असल्याचे डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सांगितले असून या अभिनव उपक्रमाचे शहर व तालुक्यातून मोठे कौतुक होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *