आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

अहिल्या नगर जिल्ह्यात स्वभाग भांडलावर चालणाऱ्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सभासदांच्या सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी महावितरण कंपनीत संगमनेर विभागाच्या आश्वी कक्ष कार्यालयात कार्यरत असणारे हेमंत सूर्यवंशी यांची यांची निवड संस्थेचे अध्यक्ष प्रदीपजी भाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत ही घोषणा करण्यात आली.

 

यावेळी राजेंद्र क्षीरसागर, अमोल आभाळे, अनिल नजन, गणेश कुंभारे, रविकांत सरोवरे, राहुल वरघंटे, अशोक सोनवणे, अशोक पालवे, लक्ष्मण वंधावणे, मनोरमा कळंबे, धरती घबाडे आदी संचालक उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थित हेमंत सूर्यवंशी यांना तज्ञ संचालक पदावर निवडीचे पत्र बहाल करण्यात आले.

 

हेमंत सूर्यवंशी हे महावितरण कंपनीत गेली पंधरा वर्षा पासुन कार्यरत असुन एम.कॉम.,जी. डी.सी अँड ए.,एम.बी.ए व इलेक्ट्रिकल इंजिनिअर अशा विविध पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. तसेच महावितरण कंपनी ने हेमंत सूर्यवंशीना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल महावितरण चा मानाचा समजला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कारही देऊन सन्मान केलेला आहे.

 

पतसंस्थेच्या माध्यमातून सभासदाच्या हिताचे निर्णय घेतले जातील व त्यांना न्याय देऊ अशी ग्वाही हेंमत सुर्यवंशी नीं दिलीय त्यांच्या निवडी बद्दल यांचे संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता वट्टमवार आश्वी कक्ष कार्यालयातील सहाय्यक अभियंता अक्षय विखे , कामगार महासंघाचे महामंत्री अरुणजी पिवळे , प्रदेश प्रभारी जगदाळे ,वरिष्ठ पदाधिकारी तसेच आश्वी कक्ष कार्यालयातील सर्व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed