आश्वी । झुंजार न्यूज
पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्र मोहिमेचा एक भाग म्हणून पानोडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरात आरोग्य विभागाच्या पुढाकाराने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात थोरात विदयालयाचे मुख्याध्यापक सोनवणे , डॉ गौतम वदक , आरोग्य सेविका सौ लता बर्डे , आरोग्य सेवक किशोर कोळपे , आशा सेविका सौ शोभा गायकवाड , सौ उषा कदम आदीसह ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला, ज्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
परिसरात हिरवळ वाढवणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि ग्रामपातळीवर पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे ही या कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्ट्ये होती. यावेळी उपस्थित सर्वांनी वृक्षलागवड ही काळाची गरज असल्याचे मान्य केले आणि प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. हा उपक्रम पानोडी गावासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, यातून पर्यावरण रक्षणाचा मोलाचा संदेश देण्यात आला.
Post Views: 589


