आश्वी । झुंजार न्यूज

सामाजिक क्षेत्रात निरंतर वाखण्याजोगे विविध उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करणारे कै. कुंडलिक धोंडीबा पाटील गायकवाड या सेवाभावी संस्थेचे कार्य निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सिताराम चांडे यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे संस्थेच्या वतीने आयोजित विविध देवतांच्या आरती संग्रह प्रकाशन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष पत्रकार संजय गायकवाड,पत्रकार योगेश रातडीया,पत्रकार राजेश गायकवाड,पत्रकार वैभव ताजणे,रविंद्र बालोटे,ऋषीकेश डमाळे,सचिन पोपळघट, अदिनाथ जाधव, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या आरती संग्रहात गणपती, देवी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, हनुमान चालिसा,राम आरती, संत पुंजाआई माता अशा विविध आरत्यांचा  समावेश असून, धार्मिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी हे कार्य समाजाला मोठे योगदान देणारे आहे. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

 

सेवाभावी संस्थेचे धर्म रक्षकाचे काम हृदयस्पर्शी  धर्म,संस्कृती आणि समाज सेवेच्या कार्यात अग्रभागी राहून संस्थेने केलेला हा उपक्रम निश्चितच हृदयस्पर्शी व प्रेरणादायी ठरत आहे.

योगेश रातडीया पत्रकार व उद्योजक आश्वी बुद्रुक ता.संगमनेर

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *