कर्जत । झुंजार न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुशभैलुमे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील दलित वस्त्यांमध्ये झालेल्या निकृष्ट कामाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनात ‘सनई वाद्य’ वाजवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला जात आहे.

आंदोलनाच्या नवव्या दिवशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गाडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे घोषित केले.

याप्रसंगी त्यांच्यासोबत बाळासाहेब कांबळे, कुलदीप गंगावणे, अविनाश कांबळे, अनिल समुद्र, बबन भैलुमे, बापु भैलुमे, अविनाश गायकवाड, मनोहर मोरे, सुनिल गायकवाड, नंदकिशोर सोनवणे, पत्रकार देवा खरात, मनोहर पोटे, अरुण नेवसे, दत्तात्रय तनपुरे, दिनेश हिरभगत, राजेंद्र घोडके, भिमराव साळवे, दादासाहेब कांबळे, सागर कांबळे, हौसराव मोरे, बबन समुद्र, छगन समुद्र, आणि अविनाश गंगावणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
