सौ.कांचनताई थोरात यांना बंधू शोक

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे व सौ.कांचनताई थोरात यांचे बंधू तथा पश्चिम महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव शहाजीराव पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे.

वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या तांबवे गावचे शहाजीराव पाटील यांनी राजकारण व समाजकारणातून सांगली जिल्ह्यात व वाळवा तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले. त्यांचा समाजकारणाचा वारसा जपताना नेताजीराव पाटील यांनी ज्येष्ठ नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाचे चेअरमनपद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळून या संघाला लौकिक मिळवून दिला.

संगमनेर तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते सातत्याने उपस्थित राहत याचबरोबर येथील सहकारी संस्था व सांगलीतील सहकारी संस्था यांच्यामध्ये कायम समन्वयक म्हणून त्यांनी काम केले.अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असलेले नेताजीराव पाटील हे आबा म्हणून सर्वत्र परिचित होते. संगमनेर मध्ये त्यांना सर्व मामा म्हणून ओळखायचे.

त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली असून अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावान पद्धतीने काम करणारा लोकसेवक हरपल्याची भावना मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. तर सतत शेतकरी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करून त्यांच्या जीवनात संपन्नता निर्माण करण्यासाठी जिवाभावाचा धडपडणारा सहकारी गमावल्याची भावना मा.प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नेताजीराव पाटील यांच्या निधनाबद्दल काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकाऱ्यांनी व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *