संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेरचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार तथा साहित्यिक अरविंद गाडेकर यांनी लिहिलेल्या विविध ललित कथांचा मनातल पानावर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वा. के.बी. दादा सभागृह,सह्याद्री कॉलेज येथे महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लेखक अरविंद गाडेकर यांनी दिली आहे.

या पुस्तकाबाबत अधिक माहिती देताना अरविंद गाडेकर म्हणाले की, दररोज विविध घटना आपल्या परिसरात घडत असतात या घटनांमधून काही प्रतिक्रिया मनावर उमटतात आणि या मनावर उमटलेल्या प्रतिक्रियांच्या ललित कथा मनातल्या पानावर या पुस्तकांमध्ये संग्रहित केलेले आहेत. यापूर्वी सासू वर्सेस सून हे त्यांचे पुस्तक अत्यंत लोकप्रिय ठरले होते. मनातल पानावर या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सह्याद्री कॉलेज येथील के.बी दादा सभागृह येथे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी आमदार सत्यजित तांबे,शारदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुवर्णा काकी मालपाणी, सौ. दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, ज्येष्ठ संपादक किसन भाऊ हासे, लेखक व कवी अनिल देशपांडे उपस्थित राहणार आहेत.

तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर राक्षे,गिरीश सोमानी, दिलीप उदमले,लक्ष्मण ढोले, अनिल सोमणी व साहित्य परिषद आणि पुस्तक प्रकाशन सोहळा समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *