संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर शहरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दहा दिवसांच्या उत्सवानंतर, उद्या, शनिवारी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप दिला जाईल.

 

 

या पार्श्वभूमीवर, संगमनेर शहर आणि अकोले शहर व तालुक्यात तसेच संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मंडळांनी तयारी सुरू केली आहे.

 

 

 

प्रशासनाने डीजेवर बंदी घातल्याने पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांना निरोप दिला जाईल.

 

 

 

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून, शांतता समितीची बैठकही झाली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी प्रशासन आणि गणेश मंडळे सज्ज आहेत. 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *