शेडगाव येथे चिमुकल्यावर बिबट्याचा भीषण हल्ला !

आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे गुरुवारी सांयकाळी प्रवरा नदीवरील नवीन पुलालगत चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात श्रीधर बंडु फड (वय ५) गंभीर जखमी झाला असून त्याचा जीव वाचविण्यासाठी आई व आजीने केलेले अद्वितीय धाडस गावभर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी लहानु फड यांचा नातू श्रीधर हा आई सौ. भारती बंडु फड यांच्यासह माहेरी शेडगाव-उंबरी प्रवरा नदिवर नविन पुलालगत  संपत सावित्रा नागरे यांच्या घरी आला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास आई भारती फड, आजी सिंधुबाई नागरे व मामा शुभम नागरे हे घास कापण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी घासाच्या शेतात बसलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला शेजारील उसाच्या शेतात ओढून नेले.

 

घटनेदरम्यान मुलाचे आर्त ओरडणे ऐकून आई व आजी थेट उसाच्या शेतात धावल्या. जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याच्या मागे जाऊन श्रीधरला खेचून घेतले. मामा शुभम नागरे यांनी तत्काळ जखमी अवस्थेत मुलाला उपचारासाठी आश्वी येथे आणि पुढे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून श्रीधरला सर्वतोपरी उपचार मिळावेत यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. तसेच वनविभागाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

 

 

संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे

 

 

 

 

 संगमनेर भाग २ वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून पथक शेडगाव येथे पिंजरे घेऊन दाखल होत आहे. .

ॲड. दिलीप सांगळे, पोलिस पाटील शेडगाव

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *