ज्येष्ठ पँथर नेते एकनाथ भिंगारदिवे यांना श्रद्धांजली: पुण्यानुमोदन जलदान विधी शुक्रवार दिनांक १९/०९/२०२५ रोजी
अहिल्यानगर । झुंजार न्यूज
रामदास आठवले यांचे खंदे समर्थक आणि पँथर चळवळीशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते, पँथर एकनाथ मारुती भिंगारदिवे यांच्या निधनानंतर त्यांचा पुण्यानुमोदन जलदान विधी आणि अभिवादन सभा शुक्रवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. रिपब्लिकन नेते विजयराव वाकचौरे आणि श्रीकांत भालेराव यांनी या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून भिंगारदिवे यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले आहे.

पँथर चळवळीतील एक निष्ठावान चेहरा
एकनाथ भिंगारदिवे यांनी आपल्या बालपणापासूनच आंबेडकरी चळवळीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. यातूनच त्यांची रामदास आठवले यांच्याशी जवळीक निर्माण झाली. समाजाच्या न्याय हक्कांसाठी त्यांनी पँथर चळवळीत हिरीरीने काम केले आणि लोकांना व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले.
अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथील रहिवासी असलेले एकनाथ भिंगारदिवे यांचे नगर शहर आणि जिल्ह्यात पँथर चळवळ तसेच रिपब्लिकन पक्ष वाढविण्यात मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची आणि पँथर चळवळीची मोठी हानी झाली आहे.

श्रद्धांजली सभेचे ठिकाण:
वृंदावन मंगल कार्यालय, नागरदेवळे रोड, भिंगार.
समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि भिंगारदिवे यांच्या स्नेहीजनांनी या सभेला उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Post Views: 673

