आश्वी । झुंजार न्यूज

 

दि बुद्धिस्ट सोसायटीच्या मिशनरी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने देशात बुद्ध धम्माची पुन्हा लाट येणार असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी केले.

 

 

रणशूर म्हणाले मी सारा भारत बुद्धमय करीन ही बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनाचे प्रमुख उद्दिस्ट ठरवले असून येणाऱ्या काळात गाव तेथे शाखा उभारून बाबासाहेबांच्या विचारला अनुसरून कृतिकार्यक्रम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने आखला आहे.

 

 

शिबलापूर येथील माळेवाडी ग्रामशाखा उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी धम्म ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.तालुका सरचिटणीस राजू मुन्तोडे यांनी बौद्ध पूजापाठ करून वातावरण मंगलमय केले.संगमनेर तालुका प्रभारी विश्वास जमधडे, कोपरगाव तालुका प्रभारी बिपीन गायकवाड,संगमनेर शहराध्यक्ष विनय घोसाळे यांनी ग्रामस्थांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.

 

यावेळी अशोक गायकवाड यांनी ग्रामशाखा पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली. सचिन मुन्तोडे यांची अध्यक्षपदी तर संतोष मुन्तोडे सरचिटणीस व आकाश जगताप यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सागर मुन्तोडे व भाऊसाहेब मुन्तोडे यांची उपाध्यक्ष पदी ,किशोर मुन्तोडे व योगेश मुन्तोडे यांची सचिव पदी तर बाबासाहेब मुन्तोडे,रोहिदास मुन्तोडे ,आकाश मुन्तोडे, अनिकेत मुन्तोडे,राहुल भालेराव,जगन्नाथ मुन्तोडे,माधव मुन्तोडे, राजेंद्र जगताप,शिवाजी मुन्तोडे, अभय मुन्तोडे, विनायक मुन्तोडे,आदित्य मुन्तोडे, रामराव मुन्तोडे,सुनील मुन्तोडे,शहाजी मुन्तोडे ,दिपक मुन्तोडे,विजय मुन्तोडे, अक्षय मुन्तोडे,सिद्धार्थ मुन्तोडे,संजय मुन्तोडे,अण्णा मुन्तोडे,राजू मुन्तोडे यांनी संघटकपदी निवड करण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष यमनाजी मुन्तोडे,बी.एस. मुन्तोडे,अशोक मुन्तोडे,आश्वी शाखाप्रमुख दत्तराज मुन्तोडे,मा. प्राचार्य आनंदराव गिते, मा. प्राचार्य भिमा बोंद्रे सर, माजी पंचायत समिती सदस्य तबाजी मुन्तोडे,शिबलापूर ग्रामपंचायत उपसरपंच सुनील मुन्तोडे संयुक्त जयंती महोत्सव समिती अध्यक्ष संजय मुन्तोडे व ग्रामसेवक किशोर मांढरे,भाऊसाहेब मांढरे,सुभाष नागरे,दिलावर शेख,सचिन क्षिरसागर, शामराव पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

 

शांताराम रणशूर यांनी शाखा फलकाचे अनावरण केले. सर्व परिसर यावेळी फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्तविक राजेंद्र मुन्तोडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अनिल मुन्तोडे होते.सूत्रसंचालन शहाजी मुन्तोडे यांनी केले.उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले.

 

 

कार्यक्रमासाठी महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सांगतेप्रसंगी भोजनदान करण्यात आले.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *