संगमनेर शहरात 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या काळात आयोजन

 

संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील युवक व युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू केलेल्या आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संगमनेर शहरांमध्ये दिनांक 24 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 दररोज रात्री 7 ते 10 या वेळेमध्ये महिलांसाठी मैत्रीचा व आनंदाचा सोहळा खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ.मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.

खेळ पैठणीचा या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की,  लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुका हे विकासातून वैभवशाली ठरले आहे. संगमनेरला मोठी सांस्कृतिक परंपरा असून ही समृद्ध परंपरा जपण्यासाठी सौ शहरी एक संगमनेरी हे ब्रीद वाक्य असलेली आय लव संगमनेर ही चळवळ काम करत आहे.

नवरात्र महोत्सव हा महिलांच्या सन्मानाचा असून महिलांचे हे आनंदाचे पर्व आहे. या कालावधीमध्ये खेळ पैठणीचा हा मैत्रीचा व आनंदाचा सोहळा संगमनेर शहरात बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2025 ते शनिवार दिनांक 27 सप्टेंबर 2025 रात्री सात ते दहा या वेळेमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या सर्व ठिकाणी मा.नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, डॉ.मैथिलीताई तांबे उपस्थित राहणार आहेत.

या खेळ पैठणी कार्यक्रमाध्ये विविध खेळ मजेदार स्पर्धा प्रश्न उत्तर आणि लकी ड्रॉ असणार असून सहभागी आणि उपस्थित सर्वांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजेशाही पैठणी, गृह उपयोगी वस्तू व आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत.

तरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये संगमनेर शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांमध्ये शहरातील जास्तीत जास्त महिला व तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन आय लव संगमनेर, जय हिंद महिला मंच,  एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *